कोरोना विषानूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडूवर लाळ वापरण्यास बंदी घातली आहे. तथापि, चेंडूची चमक कायम राखण्यासाठी खेळाडू चेंडूवर घामाचा वापर करू शकतात.
मात्र आयपीएलमध्ये बुधवारी (30 सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान केकेआरचा खेळाडू रॉबिन उथप्पा चेंडूवर लाळ लावताना दिसला.
डावाच्या तिसर्या षटकात ही घटना घडली जेव्हा उथप्पाने राजस्थानचा सलामीवीर सुनील नरेनचा झेल सोडला, त्यानंतर चेंडू परत फेकत असताना त्याने चुकून त्यावर लाळ लावली.
चेंडूवर लाळ लावल्यामुळे संघाला दोन इशारे दिले जाऊ शकतात किंवा 5 धावांचा दंड देखील आकारला जाऊ शकतो.
https://twitter.com/CowCorner9/status/1311336182173716480?s=20
राजस्थानचा झाला पराभव
सलग दोन सामने जिंकल्यानंतर राजस्थानचा या सामन्यात पराभव झाला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआरने सहा बाद 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात राजस्थान संघ 20 षटकांत 7 बाद 137 धावाच करू शकला.