आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघ श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत आपले आव्हान सादर करेल. भारतीय संघाचे संघ निवड झाल्यानंतर कर्मधार रोहित शर्मा व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत दोघांचा देखील मजेदार अंदाज पाहायला मिळाला.
रोहित व आगरकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. एका पत्रकाराने भारतीय संघातील फलंदाजीक्रमाबद्दल विचारले असता रोहित म्हणाला,
“आम्ही फलंदाजीत फारसा बदल करत नाही. पहिले तीन क्रमांक तर आहे तसेच आहेत. सहाव्या क्रमांकावर हार्दिक आणि त्यानंतर जडेजा फलंदाजी करतो. चौथा पाचवा क्रमांक कधी-कधी खालीवर होतो. अगदीच आठव्या क्रमांकाचा फलंदाज सलामीला आणि सलामीचा खाली असे कधी होत नाही.”
आशिया चषकासाठी निवडलेल्या संघात चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर व पाचव्या क्रमांकासाठी केएल राहुल यांची निवड करण्यात आली आहे. याच क्रमांकावर बॅकअप म्हणून ईशान किशन व सूर्यकुमार यादव दिसून येतात. सलामीला कर्णधार रोहित व गिल तर, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करताना दिसेल.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन
(Rohit Sharma Funny Answer On Team India Batting Order For Asia Cup)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात सुरवातीच्या सामन्यांना मुकणार केएल राहुल, आगरकरांनी दिली ‘मोठी’ माहिती
शिखर धवनची भविष्यवाणी! विश्वचषकात ‘हे’ पाच खेळाडू करणार धमाका, यादीत दोन भारतीय