सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या चार दिवसांपैकी दोन दिवसांचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाया गेला असून, सामन्याच्या अखेरच्या दिवशी तसेच राखीव दिवशी काय घडणार हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र, या सामन्यादरम्यानच्या एका छायाचित्रामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली व अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा या दोघांच्या नेतृत्वाविषयी चर्चेला उधाण आले आहे.
व्हायरल झाले हे छायाचित्र
या ऐतिहासिक सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असतानाचे एक छायाचित्र फायनल झाले आहे. यामध्ये, मैदानावर गोलंदाजाने टाकलेल्या एकाच चेंडूसाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्याचे दिसत आहे. रोहित या छायाचित्रात गोलंदाजाचे कौतुक करताना तर, कोहली नाराज दिसतोय. यानंतर सोशल मीडियावर रोहित व विराट यांच्या नेतृत्वगुणांविषयी तुलना केली जातेय.
The best and the worst captain in a single frame pic.twitter.com/zJWZ9ifgtj
— Ojas (@Ojasism) June 20, 2021
चाहत्यांच्या आल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया
एका चाहत्याने हे छायाचित्र ट्विट करताना लिहिले, ‘सर्वोत्तम आणि खराब कर्णधार एकाच छायाचित्रात’
दुसऱ्या एका चाहत्याने रोहित गोलंदाजांच्या चुकीचे देखील समर्थन करतो असे म्हटले. तर, अन्य एका ट्वीटर वापरकर्त्याने ट्विट करताना म्हटले, ‘कोहली बुमराहवर नाराज आहे मात्र, रोहित त्याला प्रोत्साहन देतोय.’
Just Look at the difference Kohli blaming his bowler but Real leader Rohit encouraging Bumrah … captain we need 💔#INDvsNZ pic.twitter.com/7rXaRWQFgl
— Savage 2.0 (@Meme_Canteen) June 20, 2021
"Jo Dost/leader tumhari galtiyon ko chupakar tumhe aur jyada galtiyan karne ka badhawa de wo kabhi tumhara sachha Dost/Leader nahi ho sakta" Shame on Rohit sharma 👎 pic.twitter.com/rWIumbB02L
— O i (@Rajasathani_4) June 20, 2021
https://twitter.com/Pandey45_/status/1406619918150225922
https://twitter.com/ya_jhakaas/status/1406668859881390088
Kohli: BC wicket le lo yar warna log mujhe hi blame karenge sab ke liye captaincy nahi aati ye woh…
Rohit: Oh yeah ! come on come boys … Aise hi dalte raho … pic.twitter.com/rLUelXCt6W
— O i (@Rajasathani_4) June 20, 2021
अंतिम सामना अनिर्णित होण्याच्या दिशेने
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर, पुढील दोन दिवसांवर न्यूझीलंडने वर्चस्व गाजवले. वेगवान गोलंदाज कायले जेमिसनच्या पंचकाच्या जोरावर न्यूझीलंडने भारताला पहिल्या डावत २१७ धावांवर रोखले. भारतासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावा बनविल्या.
प्रत्युत्तरात, टॉम लॅथम व डेवॉन कॉनवे यांनी ३४.२ षटकात ७० धावांची सलामी दिली. लॅथम (३० धावा) धावांवर बाद झाल्यानंतर कॉनवेने आपला स्वप्नवत फॉर्म कायम राखत कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तो ५४ धावांवर बाद झाला.सध्या न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद १०१ धावा असून, कर्णधार केन विलियम्सन (१२ धावा) व अनुभवी रॉस टेलर (००) हे न्यूझीलंडसाठी मैदानावर आहेत. सामन्यातील चौथा दिवसही पावसामुळे रद्द करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
एकच नंबर! वयाच्या ८३ व्या वर्षी आजीबाई करतायेत वेटलिफ्टींग; व्हिडिओ पाहून बसेल आश्चर्याचा धक्का
केशव महाराजची कमाल! हॅट्रिकसह ६१ वर्षानंतर बनला ‘अशी’ कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज