विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ (team india) सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने पहिला विजय मिळवत आघाडी घेतली आहे. अशात दुसऱ्या कसोटी सामन्याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत चाचली आहे. भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा (ashish nehra) याने दुसऱ्या कसोटी सामन्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नेहराच्या मते भारतीय संघासाठी दुसरा कसोटी सामना जिंकणे सोपे असणार आहे. कारण, दोन्ही संघांमध्ये मोठे अंतर आहे.
कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील प्रदर्शन पाहता असे दिसते की, भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेपेक्षा अधिक भक्कम आहे. दक्षिण अफ्रिकेकडे अनुभवी खेळाडूंची कमतरता दिसत आहे. अशात यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आशीष नेहराला वाटत आहे की, भारतीय संघाकडे दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. दुसऱ्या सामन्यात जर भारतीय संघ विजयी झाला, तर कसोटी मालिका देखील जिंकेल.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना नेहरा म्हणाला की, “भारतीय संघाने २०२१ ज्याठिकाणी संपवले होते, संघ तेथूनच सुरुवात करू इच्छित असेल. दोन्ही संघांमध्ये मला खूप मोठे अंतर दिसत आहे. दक्षिण अफ्रिकेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. डी कॉकच्या निवृत्तीनंतर त्यांची समस्या अधिकच वाढली आहे. तो संघाचा अनुभवी खेळाडू होता आणि त्याच्या जाण्याने एक मोठी जागा खाली झाली आहे. डीन एल्गर आता विचार करत असेल की, त्याच्या आजूबाजूला वरिष्ठ खेळाडू असते, तर बरे झाले असते. डी कॉकचे जाणे एक चिंतेचा विषय आहे.”
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा पहिल्या सामना जिंकून भारतीय संघाने दौऱ्याची चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्याचा विचार केला तर, भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांमध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन करून विजय मिळवला. तर, दक्षिण अफ्रिकेच्या धर्तीवर भारतीय संघाने जिंकलेली ही पहिली कसोटी मालिका असेल.
महत्वाच्या बातम्या –