बॉलिवडूचा किंग नावाने ओळखला जाणारा शाहरुख खानला क्रिकेटचे किती वेड आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट लीग आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स हा शाहरुखच्याच मालकीचा संघ आहे. त्याला अनेकदा आयपीएल सामन्यांदरम्यान मैदानात पाहिले गेले आहे. शाहरुखने आता क्रिकेटविषयी त्याचे हेच प्रेम दाखवत मोठा निर्णय घेतला आहे. तो अमेरिकेच्या लॅस एंजेलिसमध्ये क्रिकेटचे मोठे आणि जागतिक दर्जाचे स्टेडियम बांधायला निघाला आहे.
दोन वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या केकेआरचा (Kolkata Knight Riders) मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) अनेकदा त्यांच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात पोहोचला आहे. त्याचे क्रिकेटविषयीचे प्रेम कुणापासून लपून राहिले नाहीये. केकेआरव्यतिरिक्त शारुखने जागातील इतर टी-२० लीगमध्येही संघ खरेदी केले आहेत. आता त्याने एक पाऊल पुढे टाकत थेट स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा संघ केकेआर आणि यूएसए एमएसली म्हणजेच मेजर लीग क्रिकेट संयुक्तरित्या हे स्टेडियम उभे करणार आहेत. केकेआरने त्यांच्या ट्वीटवर ही माहिती दिली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लॅस एंजलिसमधील हे स्टेडियम १५ एकरमध्ये पसरलेले असेल. शुक्रवारी (२९ एप्रिल) शाहरुखने स्वतः याविषयी माहिती दिली. शाहरुख म्हणाला की, “लॉस एंजलिसमध्ये जागतिक दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बनवण्याची योजना आमच्यासाठी आणि एमएलसीसाठी खूप उत्साहित करणारी आहे. आम्हाला यात कसलीही शंका नाहीये की, जगातील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक असलेल्या या ठिकाणी ही निर्मिती झाल्यावर क्रिकेटमध्ये होणाऱ्या बदलांवर मोठा प्रभाव पडेल. एमएलसीमध्ये आमची गुंतवणूक अमेरिकेतील क्रिकेटच्या भविष्यासाठी रोमांचक असणार आहे.” माध्यमांतील वृत्तानुसार, या स्टेडियममध्ये एका वेळी १०,००० प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता येणार आहे.
🚨🇺🇸UPDATE: @MLCricket and the Knight Riders Group are joining hands to build a world class cricket venue in the Greater Los Angeles metropolitan area in #USA. More details inside: https://t.co/PenIvm1Udl#BuildAmericanCricket #MLC #Cricket pic.twitter.com/oHAFP0GJ73
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 29, 2022
दरम्यान, शाहरुखचा आयपीएल संघ केकेआरच्या चालू हंगामातील प्रदर्शनावर एक नजर टाकली, तर ते समाधानकारक राहिले नाहीये. चालू हंगामात केकेआरने सुरुवातीच्या ९ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत आणि राहिलेल्या ६ सामन्यात पराभव स्वीकारला आहे. गुणतालिकेत त्यांचा संघ सध्या ६ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईकडे गमावण्यासाठी काहीच नाही! आतातरी अर्जुन तेंडुलकरला मिळणार का पदार्पणाची संधी?
त्याच्यावर अनेकदा टीका झाली पण ‘त्याने’ मात्र बॅटनेच उत्तरं दिली!