रविवारी (१८ एप्रिल ) वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगतदार सामना पहायला मिळाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयात दिल्ली कॅपिटल्स संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन याने महत्वाची भूमिका बजावली. तसेच सामना झाल्यानंतर त्याने फलंदाजीमध्ये कोणता असा बदल केला आहे की, तो इतकी तुफान फटकेबाजी करत आहे? याबाबत भाष्य केले आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून पंजाब संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने १९५ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने ९२ धावांची तुफान खेळी केली होती. याच खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने हा सामना ६ गडी आणि १० चेंडू राखून जिंकला.या सामन्यात शिखर धवनला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार स्विकारल्यानंतर तो म्हणाला की, “मी सतत हाच प्रयत्न करत होतो की माझा स्ट्राईक रेट वाढवत राहू. त्यामुळे मी जोखीम घ्यायला सुरुवात केली. मला माझ्या फलंदाजी कुठलाही बदल करण्यात भीती वाटत नाही. मी बदल करण्यासाठी नेहमी तयार असतो. माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की, मी जशी नेट्समध्ये फलंदाजी करतो, तशीच सामन्यातही करावी.”
“मला स्टेप आऊट होऊन खेळताना भीती वाटत नाही. तसेच मी लेग साईडच्या शॉट्सवर खूप मेहनत घेतली आहे. मी क्रीजच्या आत येऊन गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय यावर माझी फलंदाजी निर्भर आहे. माझ्या स्लॉग शॉटमध्ये खूप फरक पडला आहे. मी माझ्या फलंदाजीबाबत निश्चिंत आहे, यासोबतच सावधदेखील आहे. शॉसोबत फलंदाजी करताना मी खूप आनंद घेत आहे. आम्ही खूप चांगली कामगिरी करत आहोत. हे संघासाठी चांगले संकेत आहेत,” असे शेवटी तो म्हणाला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाकडून मयंक अगरवालने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ६१ धावा केल्या. २० षटक अखेर पंजाब संघाने १९५ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करताना शिखर धवनने ९२ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉने ३२ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
चिडका शमी! धवनने नको म्हटले असतानाही मुद्दाम टाकला चेंडू अन् पडला तोंडघशी, बघा व्हिडिओ
हिम्मत तर पाहा गड्याची! अर्शदीपने धवनपुढेच केली त्याच्या सेलिब्रेशनची ‘कॉपी’, एकदा व्हिडिओ पाहाच
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची विजयाची हॅट्रिक, कर्णधाराने ‘या’ ३ शिलेदारांना दिले श्रेय