सध्याच्या घडीचा कसोटी क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज आपल्यापुढे जास्त टिकणार नसल्याचे भाष्य पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केले आहे.
एका वेबपोर्टलने जुने व नवे प्रत्येकी १० गोलंदाज व फलंदाज घेऊन त्यांच्यात एक स्पर्धा लावुन चाहत्यांना कोण जिंकेल, असं विचारलं आहे.
यात अनेक चांगले गोलंदाज आहेत, तर काही आजी माजी दिग्गज फलंदाजही आहे. यात शोएब अख्तर व स्टिवन स्मिथ यांच्यात सामना दाखवला आहे.
या ट्विटवर कोट करत शोएब अख्तरने आपण स्मिथला सहज बाद करु, असे सांगतिले आहेत. “आजही पहिले तीन स्मिथला जखमी करणारे बाऊंसर, तर चौथ्या चेंडूवर स्मिथ बाद. हाहाहाहा,” असे अख्तरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Even today, 3 hurting bouncers and i can dismiss @stevesmith49 on the 4th ball. Lol https://t.co/6vvmrfFHNK
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) May 11, 2020
शोएब अख्तरने २०११मध्ये ८ मार्च २०११ रोजी न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषकात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सध्या तो सोशल मिडीयावरील त्याच्या पोस्टमुळे क्रिकेटजगतात सर्वाधिक चर्चेत आहे.