न्यूझीलंड दौर्यावरील पाकिस्तानचे सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची पुष्टी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) केली आहे. क्राईस्टचर्च येथे जैव- सुरक्षित वातावरणात असलेल्या काही सदस्यांनी पहिल्याच दिवशी आयसोलेशन प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यानंतर न्यूझीलंड मंडळाला कळवण्यात आले. तरीही आतापर्यंत या सहा खेळाडूंची नावे समजलेली नाहीत.
आयसोलेशनदरम्यान सरावासाठी मिळालेल्या सूटवरही आता बंदी घातली आहे.
न्यूझीलंडमध्ये आयसोलेशन प्रोटोकॉलनुसार, पाकिस्तान संघाच्या सहा सदस्यांना आयसोलेशन सुविधेतून वेगळ्या ठिकाणी हलवले जाईल.
यापूर्वी न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानच्या फखर झमानलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो या दौऱ्यातून बाहेर पडला होता.
पाकिस्तान संघाला या दौऱ्यात ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात टी२० सामन्याने होईल. यातील पहिला सामना १८ डिसेंबर रोजी ऑकलंड येथे खेळला जाईल.
पाकिस्तान संघाने या दौऱ्यापूर्वी बाबर आझमला कसोटीचा कर्णधार म्हणून निवडले होते. ही त्याची कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. याव्यतिरिक्त आझम आधीपासूनच वनडे आणि टी२० क्रिकेट संघाचे नेतृत्त्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
KBC मध्ये ७ कोटी रुपयांसाठी विचारला क्रिकेटबद्दल अवघड प्रश्न, वाचा काय आहे उत्तर?
“यष्टीरक्षकांसाठी धोनी एक आदर्श, भूमिका कशी पार पाडायची हे त्याने दाखवून दिलं“
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाच टी२० सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय धुरंदर
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज