आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजित केले गेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा होणार आहे. तसेच स्पर्धेतील दुसरा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे.
आरसीबीने पहिल्या सामन्यासाठी त्यांच्या सरावास सुरुवात केली असून कर्णधार विराट कोहली शुक्रवारी(१७ सप्टेंबर) सराव सत्रासाठी उपस्थित होता. तो इंग्लंड दौऱ्यानंतर सहा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करून पहिल्यांदाच संघासोबत मैदानावर सामील झाला होता. यावेळी दोन महान खेळाडूंनी गळाभेट झाल्याचे दिसले आहे.
विराट आणि दक्षिण अफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलिअर्स या दोघांनी एकमेकांची कडकडून गळाभेट घेतलेली दिसली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना तो आवडत आहे.
डिव्हिलिअर्स आणि विराट २०११ पासून राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी एकत्र खेळत आहेत. एवढ्या वर्षांपासून एकत्र खेळत असल्यामुळे त्यांचे नाते खूप मजबूत झाले आहे. दोघांनी मैदानावर आणि मैदानाबाहेर एकमेकांविषयीचे प्रेम आणि आदर जगजाहीर केले आहे. या व्हिडिओतही दोघांमधील प्रेम उघडपणे दिसत आहे.
विराटने आरसीबी संघातील खेळाडूंबरोबर सरावालाही सुरुवात केली. तसेच त्याने अन्य खेळाडूंचीही भेट घेतली.
Bold Diaries: Virat Kohli joins the RCB team after quarantine
There were smiles, hugs and laughter in the RCB camp as captain Virat Kohli, Mohammed Siraj and some of our foreign players had their first hit in the nets.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/gxSEVf15rR
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 18, 2021
आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ चांगली कामगिरी करतो मात्र, संघाला अध्याप एकाही हंगामामध्ये ट्राॅफी जिंकता आली नाही. आयपीएल २०२१ मध्ये हे दोन्ही खेळाडूं त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. दोघांसाठी आयपीएलचा दुसरा टप्पा खूप महत्वाचा आहे.
एकीकडे विराट आयपीएल ट्राॅफी जिंकून स्वत:ला कर्णधाराच्या रूपात सिद्ध करू इच्छित आहे, तर दुसरीकडे एबी त्याच्या वयाच्या ३७ व्या वर्षी त्याच्या क्रिकेटमधील अंतिम काही दिवस अनुभवत आहे. अशात आयपीएल ट्राॅफी संघाने जिंकावी, अशी त्याचीही इच्छा असणार. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात संघाचे चांगले प्रदर्शन केले होते. आरसीबी १० गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात एबीने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. त्याने ७ सामन्यांमध्ये ५१.७५ च्या सरासरीने २०७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वाधिक धावसंख्या ७६ होती. डिव्हिलियर्स दुसऱ्या टप्प्यातही अशाच फार्ममध्ये असावा, अशी कोहली आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरची इच्छा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
चौतीस वर्षीय रोहितनंतर ‘या’ युवकांवर असेल टीम इंडियाची मदार, रांगेत एकाहून एक बहाद्दर शिलेदार
भारताच्या टी२० विश्वचषकात अदलाबदलीची शक्यता, आयपीएल प्रदर्शनावर अवलंबून असेल ‘या’ खेळाडूंचं नशीब