श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (SLvsAUS) यांच्यात दुसरा कसोटी सामना गॉल स्टेडियम, कोलंबो येथे सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३६४ धावात संपुष्टात आला. या सामन्यातून श्रीलंकेचा प्रबत जयसुर्या (Prabath Jayasuriya) याने कसोटीमध्ये पदार्पण केले आहे. डाव्या हाताच्या या फिरकीपटूने पदार्पणाच्याच सामन्यात ६ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. याबरोबरच त्याने महत्वाच्या यादीत प्रवेशही केला आहे.
प्रबत हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणातच ५ किंवा ५ पेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो सहावा श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर तो पदार्पणातच ६ विकेट्स घेणारा श्रीलंकेचा तिसराच गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी उपुल चंदना आणि प्रवीण जयविक्रमा यांनी अशी कामगिरी केली आहे. चंदनाने १९९९मध्ये पाकिस्तान विरुद्ध पदार्पणाच्या सामन्यातच एका डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या.
जयविक्रमाने २०२१मध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ९२ धावा देत पहिल्याच डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या. आता प्रबतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात ११८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत.
प्रबतची आंतरराष्ट्रीय पदार्पणाची विकेट्स लॅब्यूशेनची ठरली आहे. नंतर त्याने ट्रेविस हेड, कॅमेरून ग्रीन, ऍलेक्स कॅरी, स्टार्क, नॅथन लायन यांना बाद केले आहे.
पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सहा विकेट्स घेणारे श्रीलंकेचे खेळाडू-
उपुल चंदना
प्रवीण जयविक्रमा
प्रबत जयसूर्या*
या सामन्यात स्टिव्ह स्मिथने नाबाद १४५ धावांची खेळी केली आहे. हे त्याचे कसोटी कारकीर्दीतील २८वे शतक ठरले आहे. दुसऱ्या दिवशीही त्याने खेळपट्टीवर उपस्थिती दर्शवत ऑस्ट्रेलियाची एक बाजू कोसळत असताना दुसरी बाजू लढवत धावफलक हलता ठेवला. ऑस्ट्रेेलियाचा पहिला डाव ३६४ धावांतच संपुष्टात आला आहे. तसेच मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याने १०४ धावा केल्या आहेत. त्याचे हे परदेशी भुमीवरील पहिले कसोटी शतक ठरले आहे.
श्रीलंकेच्या पहिल्या डावाची सुरूवात अडखळत झाली. सलामीवीर पथुम निसांका हा ६ धावा करत बाद झाला. त्यानंतर आलेल्या कुशल मेंडिस दिमुथ करूणारत्ने सोबत डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी रचली. करुणारत्ने ८६ धावा करत बाद झाला. मेंडिस ८४ आणि अँजलो मॅथ्यूज ६ धावा करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. श्रीलंकेने दोन गडी गमावत १८४ धावा केल्या आहेत.
How about that from Prabath Jayasuriya – making Test cricket look very easy! #SLvAUS pic.twitter.com/GUrzZ9rJFO
— cricket.com.au (@cricketcomau) July 9, 2022
ऑस्ट्रेलियाने पहिला सामना १० विकेट्सने जिंकला आहे. यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहुणा संघ १-० असा पुढे आहे. हा सामना जिंकून यजमान संघाला मालिका बरोबरी करण्याचा निर्धार असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रविंद्र जडेजा आणि चेन्नई सुपर किंग्जचं ‘ब्रेकअप’? फ्रँचायझीकडून मोठं विधान आलं पुढे
‘टी२० विश्वचषकानंतर बरेच खेळाडू निवृत्त होऊ शकतात’, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचे मोठे संकेत
भारताचे असे तीन फलंदाज जे वनडेत कधी बाद झाले नाहीत