मुंबई | काल श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने २०१८ वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट झाला. हे वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी खूपच विशेष ठरले. यावर्षी १९५९ प्रथमच फलंदाज धावा करताना मोठ्या प्रमाणार झगडताना दिसले.
असे असले तरी फलंदाजीतही यावर्षी अनेक विक्रम झाले. अशीच काहीशी फलंदाजी तसेच गोलंदाजीतील विक्रमांची अपेक्षा २०१९ वर्षातही क्रिकेटप्रेमींना असणार आहे.
२०१९मध्ये काही असे पराक्रम होणार आहे जे यापुर्वी कधीही झाले नाहीत. त्यातील काही निवडक पराक्रम असे-
-इंग्लंड संघाला कसोटी क्रिकेटमध्ये ५ लाख धावा करणारा पहिला संघ होण्यासाठी केवळ ७०७४ धावांची गरज आहे.
– क्रिकेट जगतात १ हजार वन-डे खेळणारा पहिला संघ होण्यासाठी तीन संघांना मोठी संधी आहे. यात भारत (९५३), ऑस्ट्रेलिया (९१९) आणि पाकिस्तान ९०० या तीन संघांचा समावेश आहे.
-ख्रीस गेलला वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी २७३ धावांची गरज आहे. सध्या गेलच्या नावावर ९७२७ धावा आहेत.
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावा करणारा १०११ धावांची गरज आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या १० खेळाडूंमध्ये येण्यासाठी विराटला १५७१ धावांची गरज आहे. तसेच वन-डेत पहिल्या १० खेळाडूंमध्ये येण्यासाठी विराटला १७३ धावांची गरज आहे.
-टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कऱणारा फलंदाज होण्यासाठी रोहित शर्माला ३४ तर विराट कोहलीला १०४ धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–कमी सामन्यात कर्णधार राहुन कोहली विक्रमांत धोनी- गांगुलीच्या पुढे
–बुमराह पॅटर्न लईच वाईट, आफ्रिका, इंग्लड आणि आता ऑस्ट्रेलिया, कुणालाच समजला नाही
–बुमराह एक, पराक्रम अनेक- भारताच्या या शिलेदाराचे भीमपराक्रम पहाच