ऍशेस 2023 मध्ये डेविड वॉर्नर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली आहे. वॉर्नरची बॅट शांत आहे, तर ब्रॉड त्याचा पिझा सोडण्याच्या विचारत नाहीये. मागच्या तीन सामन्यात ब्रॉडने वॉर्रनला ती वेळा तंबूत धाडले आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड यांनी एक ट्वीट केले. माहितीनुसार आयसीसीकडून या ट्वीटवर बोट ठेवले गेल्यामुळे ख्रिस ब्रॉडला हे ट्वीट डिलिट करावे लागले.
डेविड वॉर्नर (David Warner) जर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा कुणाची शिकार बनला असले, तर तो स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) आहे. ब्रॉडने त्याला तब्बल 17 वेळा बाद किले आहे, जो त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या डावात ब्रॉडने वॉर्नरला बाद केल्यानंतर ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांनी एक ट्वीट केले. अनेकांच्या मते ते ट्वीट आक्षेपार्ह होते. स्टुअर्ट ब्रॉडचे वडील म्हणून त्यांनी हे ट्वीट आनंदाच्या भरात केले. पण त्याच वेळी आपल्या प्रमुख भूमिकेचा विसर त्यांना पडल्याचे दिसते. ख्रिस ब्रॉड हे आयसीसीचे मॅच रेफरी देखील आहे. असात एखाद्या फलंदाजाविषयी अशा प्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होणे त्यांच्या पदाला शोभा देणारे नव्हते.
हेडिंग्ले कसोटीच्या दुसऱ्या डावात वॉर्नरने विकेट गमावल्यानंतर काहीच वेला ख्रिस यांनी हे ट्वीट केले होते, जे काही वेळानंतर डिलिट देखील केले. पण दरम्यानच्या काळात ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आणि वादाला तोंड फुटले. ख्रिस यांच्या ट्वीटमध्ये वॉर्नरचा चेहरा बार्ट सिम्पसन (एका एनिमेटेड टेलीविजन मालिकेतील पात्र) याच्या शरीरावर लावलेला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “स्टुअर्ट ब्रॉडने मला पुन्हा एकदा बाद केले.” आयसीसीने ख्रिस ब्रॉडच्या या ट्वीटविषयी कुठलेच भाष्य केले नाहीये. पण सुत्रांच्या हवाल्याने माध्यमांमध्ये असे सांगितले गेले आहे की, आयसीसीकडून सामना रेफरी ख्रिस ब्रॉड यांना सुनावले गेले आहे.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडला विजयासाठी 251 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने नाबाद 27 धावा केल्या. चौथ्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 224 धावा करायच्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 विकेट्स हव्या आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला होता. अशात ऍशेस 2023 मध्ये आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी तिसरा सामना इंग्लंडला कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. (Stuart Broad’s father tweets to troll David Warner, prompting ICC action)
महत्वाच्या बातम्या –
ट्रेविस हेडची महत्वपूर्ण खेळी! ऍशेसमध्ये आव्हान टिकवण्यासाठी इंग्लंडला 251 धावांचे लक्ष्य
IND vs WI : पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया डॉमिनिकासाठी रवाना, ब्लॅक जर्सीत दिसले खेळाडू; Photos