आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काही गुद्दे चांगलेच चर्चेत आहेत. काही खेळाडूंना या 15 सदस्यीय संघात संधी मिळाली नसल्यामुळे चर्चा होत आहेत, तर काहींना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल की नाही, यावरून चर्चा होत आहे. संघात रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांनाही टी-20 विश्वचषकासाठी निवडल्यामुळे प्लेइंग इलेव्हनविषयी संघ व्यवस्थापनापुढे मोठा पेच तयार झाल्याचे दिसते. मात्र, भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या मते या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमद्ये घेतले पाहिजे.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्याकडून दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांची संघात झालेली निवड योग्य असल्याचे सांगितले गेले. माध्यमांशी बोलताना त्यांनी असेही सांगितले की, या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली पाहिजे. गावसकर म्हणाले, “मी रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडेल. पाचव्या क्रमांकावर रिषभ पंत, सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या आणि सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक. हार्दिक आणि गोलंदाजीचे अन्य चार पर्याय देखील निवडेल. जर तुम्ही जोखीम पत्करली नाही, तर तुम्ही जिंकणार तरी कसे? तुम्ही सर्व विभागांमध्ये जोखिम घेण्याची गरज आहे, तेव्हा कुढे तोम्हाला परिणाम दिसतील.”
पंत आणि कार्तिक दोघांनाही एकाच वेळी प्लेइंग इलेव्हनमध्ये घेता येऊ शकते, असे गावसकर म्हणत आहेत. पण प्रत्यक्षात असे करणे खूपच कठीण असेल. संघ व्यवस्थापन ही गोष्ट कसे साध्य करते, हे पाहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील याविषयी मत व्यक्त केले होते. द्रविडच्या मते संघात कोणत्याही यष्टीरक्षकाला पहिली पसंती दिली जात नाही. सामन्याची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर कार्तिकने आणि पंत एकत्र प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळले आहेत. आशिया चषकात रविंद्र जडेजा दुखापत झाल्यामुळे याविषयी चर्चा होत आहे. संघ व्यवस्थापन यावर काय निर्णय घेते, हे पाहावे लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी
नेहरा आयपीएलदरम्यान कागदावर काय करायचा? गुजरातच्या प्रशिक्षकाने स्वतः दिले उत्तर
भारतीय संघासाठी मोठी बाधा ठरणार पॅट कमिन्स! म्हणतोय, ‘विश्रांतीनंतर आता…’