भारतीय संघाविरुद्ध खेळताना बुधवारी (2 नोव्हेंबर) बांगलादेश संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारताने हा सामना अवघ्या पाच धावांच्या अंतराने नावावर केला. विजयानंतर भारतीय संघाचे उपांत्य सामन्यातील स्थान जवळपास पक्के झाले आहे. बांगलादेशने लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातील चांगला खेळ दाखवला, पण नंतर पाऊस आल्यानंतर त्यांची लय बिघडल्याचे दिसले. सामना गमावल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली.
बांगलादेशला विजयासाठी या सामन्यात 185 धावांचे लक्ष्य मिळाले होते. परंतु पावसाने बाधा आणल्यानंतर पंचांनी हे लक्ष्य 151 धावांचे केले. पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी बांगलादेशने एकही विकेट गमावली नव्हती. पंरंतु सामना पुन्हा सुरू झाला, तेव्हा मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. पाऊस पडून गेल्यानंतर बांगलादेश 54 चेंडूत 85 धावा करायच्या होत्या. विजयासाठी शेवटच्या षटकात त्यांना 20 धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांचा संघ लक्ष्यापासून पाच धावांच्या अंतरावर राहिला. पराभवानंतर बांगलादेशचा कर्णदार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या मते, भारतासोबत खेळताना नेहमीच त्यांचा संघ अशाप्रकारे छोट्या अंतराने पराभूत झाला आहे.
सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलतान शाकिब काही महत्वाच्या मुद्यांवर बोलला. यावेळी तो म्हणाला की, “जेव्हा कधी आम्ही भारताविरुद्ध खेळतो, तेव्हा असेच होत आले आहे. आम्ही विजयाच्या खूप जवळ असतो, पण विजयी मिळवू शकत नाही. असे असले तरी, दोन्ही संघांनी या सामन्याच आनंद लुटला. हा एक चांगला सामना होता आणि आम्हाला असेच प्रदर्शन करायचे होते. खेळता शेवटी कुणालातरी विजय आणि कुणालातरी पराभव मिळत असतो.”
बांगलादेशचा सलामीवीर फलंदाज लिटन दास (litan das) या सामन्यात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने अवघ्या 27 चेंडूत 60 धावा कुटल्या. लिटन दासच्या या खेळीमुळेच बांगलादेशला हा सामना जिंकण्याचे बळ मिळाले. सामन्यात संघाला पराभव मिळाला असला, तरी शाकिबने लिटन दासचे या खेळीसाठी तोंड भरून कौतुक केले. भारतीय संघासाठी विराट कोहली (64/44) आणि केएल राहुल (32/50) यांनी प्रत्येकी एक एक
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशला कमी फरकाने धूळ चारण्यात भारत आहे ‘मास्टर’, 2016मध्येही केलीय खास कामगिरी
शाब्बास रे वाघांनो! थरारक सामन्यात बांगलादेशला धूळ चारत टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये