यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. आज (9 जून) रोजी भारत आणि पाकिस्तान न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भिडणार आहेत. शेवटच्या टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान आमनेसामने आले होते, त्यावेळी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळली होती. विराट कोहलीनं (Virat Kohli) या सामन्यात वर्चस्व गाजवलं होतं.
शेवटच्या टी20 विश्वचषकात पाकिस्ताननं भारतासमोर जिंकण्यासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं होत. भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना 31 धावांवरती 4 विकेट्स गमावल्या होत्या. भारतीय संघाच्या सामना जिंकण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या होत्या. परंतु भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं या सामन्यात रौद्र रुप दाखवत भारतीय संघाला सामना जिंकवून दिला होता. या सामन्यात पाकिस्तानला विराट कोहली एकटा पुरुन उरला होता.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 23 ऑक्टोंबरला मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला होता. रोहितच्या सेनेनं पाकिस्तानला 159 धावांवरती रोखले. परंतु या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय संघाचं सलामीवीर 4-4 धावा करुन तंबूत परतले.
Last time when Virat Kohli played against Pakistan in T20 WC 💥#INDvsPAK #ViratKohli pic.twitter.com/8DBZeIwmaq
— Richard Kettleborough (@RichKettle07) June 9, 2024
परंतु या सामन्यात ‘चेजमास्टर’ विराट कोहलीचा जलवा बाकी होता. कोहलीनं तिसऱ्या नंबरला फलंदाजीला येऊन संपूर्ण भारताच्या जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. 31 धावांवरती 4 विकेटेस गेल्यानंतर कोहली आणि हार्दिकनं भारतीय संघाला मजबूत स्थितीत ठेवून चांगली भागीदारी रचली. दोघांनी भारतीय संघाला 31 धावांपासून 144 धावांपर्यंत पोहोचवलं आणि त्यानंतर मोहम्मद नवाजच्या चेंडूवर हार्दिक झेलबाद झाला.
या सामन्यात विराट कोहलीनं सर्व भारतीयांना आनंदाचा जल्लोष करण्यासाठी भाग पाडलं. भारतीय संघाला जिंकण्यासाठी 8 चेंडूत 28 धावांची गरज होती. लक्ष्य गाठणं खूप कठीण होतं. परंतु 19व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हरिस रौफच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर कोहलीनं उत्तुंग 2 षटकार ठोकले. हे दोन षटकार कधीही बघितले, तरीही भारतीय चाहत्यांचा जल्लोष नेहमीच आठवतो.
कोहलीनं या सामन्यात 53 चेंडूत 82 धावांची आक्रमक खेळी खेळून जलवा दाखवला होता आणि भारतीय संघाला सामना जिंकवून दिला होता. विराट कोहलीनं (Virat Kohli) पाकिस्तानविरुद्ध 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 488 धावा बनवल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध सर्वात जास्त धावा करणारा तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. परंतु पाकिस्तानचा एकही फलंदाज भारताविरुद्ध 200 धावादेखील करु शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“बाबरनं संघाचं वातावरण बिघडवलं…” शाहीद आफ्रिदी भडकला दिलं तिखट उत्तर
“विराट कोहली जर लाहोरमध्ये खेळायला आला तर…” पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य
आंद्रे रसेलचे निवृत्तीचे संकेत, टी20 विश्वचषकानंतर करणार क्रिकेटला रामराम? म्हणाला, “ट्रॉफी जिंकल्यानंतर…”