सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जात आहे. भारतीय संघाला विश्वचषक अभियानाची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करायची आहे. विश्वचषक 16 ऑक्टोबर रोजी सुरू झाला असला, तरी भारत आधीपासूनच सुपर 12मध्ये सहभागी असल्यामुळे संघाला सुरुवातीच्या आठवड्यात एकही सामना खेळायचा नाहीये. पण यादरम्यान संघाने सराव सामने खेळले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला सराव सामना जिंकल्यानंतर भारताला बुधवारी (19 ऑक्टोबर) दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे.
टी-20 विश्वचषकापूर्वी खेळलेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताने जयमान ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी पराभूत केले होते. आता भारतीय संघाला दुसरा सराव सामना न्यूझीलंडसोबत खेळायचा आहे. उभय संघांतील हा सामना ब्रिसबेनमध्ये खेळायचा आहे. यजमान ऑस्ट्रेलियाप्रमाणेच न्यूझीलंड देखील एक बलाढ्य संघ आहे आणि स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार देखील. अशात भारताला त्यांच्याविरुद्ध खेळल्यानंतर स्वतःची गुणवत्ता समजू शकणार आहे. चला तर जाणून घेऊया भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा दुसरा सराव सामना केवा आणि कुठे पाहायला मिळेल.
- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना केव्हा खेळला जाईल? (IND vs NZ Warm up T20 Match Date)
– भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सराव सामना बुधवार म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सराव सामना कुठे खेळळा जाणार? (IND vs NZ Warm up T20 Match Venue)
– ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सराव सामना खेळला जाणार आहे. - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20 सराव सामना किती वाजता सुरू होणार? (IND vs NZ Warm up T20 Match Timing)
– भारततीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सराव सामना सुरू होईल. या सामन्याची नाणेफेक दुपारी एक वाजता केली जाईल. - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सराव सामना टीव्हीवर कोणत्या चॅनलवर पाहायचा? (IND vs NZ Warm up T20 Match TV Channel)
– आपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या (Star Sports Network) वेगवेगळ्या चॅनल्सवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 सराव सामना पाहायला मिळेल. - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सराव सामना मोबाईलवर कसा पाहिला जाऊ शकतो? (IND vs NZ Warm up T20 Match on Mobile App)
– डिजनी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar App) ऍपच्या माध्यमातून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सराव सामना मोबाईलवर पाहता येऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘मग पुढच्या वर्षी होणार विश्वचषकही…’, पाकिस्तानी क्रिकेटपटूचे बीसीसीआयला प्रत्युत्तर
प्रो कबड्डी: अखेरच्या सेकंदात पुणेरी पलटणचा थरारक विजय; पुणेकर अस्लम इनामदार ठरला हिरो