यंदाच्या टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) 19वा सामना (9 जून) रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की, सर्व चाहते सामना पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.
तत्पूर्वी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत बाबर आझम (Babar Azam), विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे खेळाडू पहिल्या, दुसऱ्या आणि स्थानावर स्थानावर आहेत.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम शीर्ष स्थानी आहे. परंतु भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे सर्वाधिक धावांचं रेकाॅर्ड त्यांच्या नावावर करु शकतात. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बाबर आझम (Babar Azam) हे तीनच खेळाडू असे आहेत ज्यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
सध्या पाकिस्तान कर्णधार बाबर आझम (Babar Azam) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 4067 धावा बनवून पहिल्या स्थानी आहे. तसंच भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) या यादीत 4038 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. परंतु टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा गाठणारा कोहली पहिला खेळाडू आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा 4026 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा जगातील एकमेव खेळाडू आहे. रोहितनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 150 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत या तीनही खेळाडूंचे आकडे सांगतात की यांच्या धावांमध्ये जास्त धावांचा फरक नाही. त्यामुळे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे तीनही खेळाडू वर्चस्व गाजवण्याच्या तयारीत असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ‘किंग’ कोहलीचा जलवा पाहा व्हिडिओ
“बाबरनं संघाचं वातावरण बिघडवलं…” शाहीद आफ्रिदी भडकला दिलं तिखट उत्तर
“विराट कोहली जर लाहोरमध्ये खेळायला आला तर…” पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य