आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आगामी विश्वचषकातील 9 सामने रिशेड्यूल केले आहेत. विविध कारणांमुळे हे सामने आधीच्या ठरलेल्या तारखेपेक्षा आधी किंवा नंतर खेळले जातील. त्यानंतर आयसीसी नुकतेच नवे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानंतर आता भारतीय संघाचे सामने कसे होतील हे आपण जाणून घेऊया.
विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर काही दिवसातच वेळापत्रकात बदल करावे लागणार अशी शक्यता निर्माण झाली होती. कारण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्या दिवशीच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस येत होता. सुरक्षेच्या समस्या निर्माण होऊ नये त्यासाठी हा सामना एक दिवस आधी घेण्याचे ठरले आहे. भारत पाकिस्तान सामन्या व्यतिरिक्त भारत नेदरलँड्स हा सामना देखील नियोजित कार्यक्रमाच्या (11 नोव्हेंबर) एक दिवस नंतर होईल.
भारत वि. ऑस्ट्रेलिया, 8 ऑक्टोबर, ठिकाण – चेन्नई ( IND vs AUS, Oct 8, Chennai )
भारत वि. अफगाणिस्तान, 11 ऑक्टोबर, ठिकाण – दिल्ली ( IND vs AFG, Oct 11, Delhi )
भारत वि. पाकिस्तान, 14 ऑक्टोबर, ठिकाण – अहमदाबाद ( IND vs PAK, Oct 14, Ahmedabad )
भारत वि. बांगलादेश, 19 ऑक्टोबर, ठिकाण- पुणे ( IND vs BAN, Oct 19, Pune )
भारत वि. न्यूझीलंड, 22 ऑक्टोबर, ठिकाण – धर्मशाला (IND vs NZ, Oct 22, Dharamsala )
भारत वि. इंग्लंड, 29 ऑक्टोबर, ठिकाण – लखनऊ ( IND vs ENG, Oct 29, Lucknow )
भारत वि. क्वालिफायर संघ, 2 नोव्हेंबर, ठिकाण – मुंबई ( IND vs Qualifier, Nov 2, Mumbai )
भारत वि. दक्षिण आफ्रिका, 5 नोव्हेंबर, ठिकाण – कोलकाता ( IND vs SA, Nov 5, Kolkata )
भारत वि. क्वालिफायर संघ, 12 नोव्हेंबर, ठिकाण – बंगळुरु ( IND vs Qualifier, Nov 12, Bengaluru)
(Team India 2023 ODI World Cup Timetable After Reschedule)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विश्वचषकाआधीच केएल राहुल दिसणार मैदानात
“मी नक्कीच तुम्हाला वर्ल्डकपमध्ये दिसणार”, कार्तिकच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया