नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा संपवून भारतीय संघ मायदेशात परतला आहे. यानंतर सर्वांना भारताच्या इंग्लंडविरुद्ध मायभूमीत होणाऱ्या मालिकांचे वेध लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात चेन्नई येथील कसोटी सामन्याने इंग्लंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. त्यासाठी २७ जानेवारी रोजी भारतीय संघ चेन्नई येथे पोहोचणार आहे. दौऱ्याची सुरुवात होण्यापुर्वी भारतीय खेळाडू चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर सराव करतील.
माध्यमांतील वृत्ताँनुसार, भारतीय खेळाडू वेगवेगळ्या गटात वेगवेगळ्या शहरातून चेन्नईला रवाना होतील आणि २७ जानेवारी रोजी एकत्र जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश करतील. चेन्नईला पोहोचल्यानंतर भारतीय संघ एक आठवडा एकांतवासात राहिल. यादरम्यान संघ व्यवस्थापन कसोटी मालिकेसंदर्भात रणनिती आखेल.
तर दुसरीकडे इंग्लंड संघ २७ जानेवारी रोजी जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश करेल. सध्या श्रीलंकाविरुद्ध चालू असलेला दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना २६ तारखेला संपेल. त्यानंतर इंग्लंड संघ भारतात येण्यासाठी उड्डाण भरेल. तर इंग्लंडवरुन भारतात येणारे बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रॉरी बर्न्स हे संघातील इतर खेळाडूंपुर्वी भारतासाठी रवाना होतील. कारण हे तिन्ही खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाचा भाग नाहीत.
भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ चेन्नई शहरातील लीला पॅलेसमध्ये सामना अधिकाऱ्यांसोबत राहतील.
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून चेन्नईच्या मैदानावर सुरुवात होईल. पहिले दोन सामने ५ आणि १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार असून उर्वरित सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
इंग्लंडचा संपूर्ण संघ:
जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स एंडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्राउले, बेन स्टोक्स, टेन लॉरेंस, जॅक लीच, डॉम सिब्ले, बेन फोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स.
इंग्लंड विरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केएल राहुल, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत हार्दिक पंड्या, रिद्धीमान साहा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव
महत्त्वाच्या बातम्या-
“इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सहज विजय मिळवेल”, ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी
“भारतीय खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन युवा खेळाडू अजूनही प्राथमिक शाळेतच”, माजी दिग्गजाचा घरचा आहेर