पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत अंतिम फेरीत टीइसीपीएसएल स्पीडिंग चिताज् संघाने पीइएसबी रोअरिंग लायन्स संघाचा 47-31असा पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत टीइसीपीएसएल स्पिडिंग चिताज संघाने पीइएसबी रोअरिंग लायन्स संघाचा 47-31असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
एकेरीत 10वर्षाखालील मुलींच्या गटात स्पिडिंग चिताजच्या देवांश्री प्रभुदेसाईने रोअरींग लायन्सच्या काव्या देशमुखचा 4-0 असा तर मुलांच्या गटात अर्चित धूत याने अमन शहाचा 4-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली.
12वर्षाखालील मुलींच्या गटात स्पिडिंग चिताजच्या आदिती लाखेला रोअरींग लायन्सच्या आस्मि आडकरने 1-6असे पराभूत केले. 12वर्षाखालील मुलांच्या गटात स्पिडिंग चिताजच्या पार्थ देवरूखकरने अनन्मय उपाध्यायचा 6-3 असा तर, 14वर्षाखालील मुलींच्या गटात वैष्णवी आडकरने सोनल पाटीलचा 6-0असा एकतर्फी पराभव केला. 14वर्षाखालील मुलांच्या गटात सुधांशू सावंतला रोअरींग लायन्सच्या ईशान गोधभरलेने 3-6असा पराभव करून संघाची आघाडी कमी केली.
16वर्षाखालील मुलींच्या गटात स्पिडिंग चिताजच्या स्नेहा रानडेने रोअरींग लायन्सच्या आर्या पाटीलचा 6-4 असा तर, 16वर्षाखालील मुलांच्या गटात यशराज दळवीने रोअरींग लायन्सच्या अथर्व आमरुळेचा 6-2असा पराभव केला.
मिश्र दुहेरी गटात स्पिडिंग चिताजच्या श्लोक गांधी व श्रावणी खवळे यांना रोअरींग लायन्सच्या रुमा गाईकैवारी व आर्यन सुतार यांनी 5-6(2)असे पराभूत केले. अखेरच्या मिश्र दुहेरी गटात स्पिडिंग चिताजच्या यशराज दळवीने स्नेहा रानडेच्या साथीत रोअरींग लायन्सच्या आर्या पाटील व अथर्व आमरुळे या जोडीचा 6-2असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या टीइसीपीएसएल स्पिडिंग चिताज संघाला करंडक व 40000रुपये, तर उपविजेत्या पीइएसबी रोअरिंग लायन्स संघाला करंडक व 25000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. तसेच, याशिवाय प्रत्येक वयोगटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला करंडक व प्रत्येकी 3000रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीएमडीटीएचे उपाध्यक्ष प्रशांत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, पीएमडीटीएचे मानद सचिव अभिषेक ताम्हाणे आणि सहसचिव जयंत कढे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच, मुंबई ज्युनियर टेनिस लीगमधील विजेता संघ गो स्पोर्ट्स रेजिंग बुल्स व पुण्यातील ज्युनियर टेनिस लीगमधील विजेता संघ टीइसीपीएसएल स्पीडिंग चिताज् यांच्यात महाराष्ट्राच्या विजेतेपदासाठी मुंबई येथे लढत होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
टीइसीपीएसएल स्पिडिंग चिताज वि.वि.पीइएसबी रोअरिंग लायन्स 47-31(एकेरी: 10वर्षाखालील मुली: देवांश्री प्रभुदेसाई वि.वि.काव्या देशमुख 4-0; 10वर्षाखालील मुले: अर्चित धूत वि.वि.अमन शहा 4-2; 12वर्षाखालील मुली: आदिती लाखे पराभूत वि.आस्मि आडकर 1-6; 12वर्षाखालील मुले: पार्थ देवरूखकर वि.वि.अनन्मय उपाध्याय 6-3; 14वर्षाखालील मुली: वैष्णवी आडकर वि.वि.सोनल पाटील 6-0; 14वर्षाखालील मूले: सुधांशू सावंत पराभूत वि.ईशान गोधभरले 3-6; 16वर्षाखालील मुली: स्नेहा रानडे वि.वि.आर्या पाटील 6-4; 16वर्षाखालील मुले: यशराज दळवी वि.वि.अथर्व आमरुळे 6-2; मिश्र दुहेरी: श्लोक गांधी/श्रावणी खवळे पराभूत वि.रुमा गाईकैवारी/आर्यन सुतार 5-6(2); मिश्रा दुहेरी: यशराज दळवी/स्नेहा रानडे वि.वि.आर्या पाटील/अथर्व आमरुळे 6-2).
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट खेळाडू:
10वर्षाखालील मुले: अर्णव पापरकर;
10वर्षाखालील मुली: सिया प्रसादे;
12वर्षाखालील मुले: अमोद सबनीस;
12वर्षाखालील मुली: आस्मि आडकर;
14वर्षाखालील मुले: अर्जुन गोहड;
14वर्षाखालील मुली: मधुरीमा सावंत;
16वर्षाखालील मुले: यशराज दळवी;
16वर्षाखालील मुली: हृदया शहा.