पाकिस्तान क्रिकेट संघाला शेवटच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघाकडून 7 विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये आपला पुढचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याने मोठे विधान केले.
काय म्हणाला अली?
हसन अली (Hasan Ali) म्हणाला की, “भारताविरुद्ध हारल्यानंतर मी निराश झालो होतो, पण आता आमच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले आहे.” पुढे तो म्हणाला, “होय, आम्हाला माहित आहे की, आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही. आम्ही सहमत नाही असे नाही. आमच्याकडून चुका झाल्या, पण जग संपले नाही. मी हे म्हणत आहे, आणि तुम्ही हे बर्याच वेळा ऐकले असेल की, काहीही बदललेले नाही. आम्ही पराभूत झालो आणि दुःखात होतो. आम्ही सर्वोत्तम संघ होतो आणि आम्ही तशी कामगिरी केली नाही. आम्ही एकत्र बसलो आणि खूप बोललो. आम्ही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोललो. आम्ही नेट्समध्ये आमच्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे.”
हसन अलीला विश्वास आहे की, त्याचा संघ आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलियाचा सामना करेल. तो म्हणाला, “आमचे 13 खेळाडू फिट आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत नाही किंवा ते आजारी नाहीत. आजारी पडलेले खेळाडू लवकर बरे होतील, अशी आशा आहे. याशिवाय आमचा सामना एका मोठ्या संघाविरुद्ध आहे. आमचाही संघ मोठा आहे. आम्हाला येथे चांगले क्रिकेट खेळून विश्वचषक जिंकायचा आहे.”
विश्वचषक 2023 स्पर्धेत पाकिस्तानने नेदरलँड्सवर विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानचा कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव झाला. बंगळुरूमध्ये काही खेळाडू आजारी पडल्याने पाकिस्तान संघाची चिंता वाढली आहे. या सामन्यातून शादाब खान बाहेर पडला असून त्याच्या जागी उसामा मीर याला संधी मिळाली आहे. (The defeat by India is sad but big statement from Pakistan cricketer)
हेही वाचा-
थांबा! वाइड बॉलसाठी अंपायरवर साधताय निशाणा? आधी ICCचा ‘हा’ नियम काय सांगतो वाचाच
Breaking: 4 आयपीएल ट्रॉफी विजेता मलिंगा पुन्हा मुंबई पलटणच्या ताफ्यात, सांभाळणार ‘ही’ जबाबदारी