डब्ल्यूडब्ल्यूई इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय रेसलर म्हणून दलित सिंह राणा उर्फ द ग्रेट खली याला ओळखले जाते. व्यावसायिक रेसलिंग सोडली असली तरी खाली सातत्याने चर्चेत असतो. नुकतेच एका टोल प्लाझा कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे बराच वादही निर्माण झालेला. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, भीमकाय शरीराचा खली अक्षरशः रडताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/ChJ4n7nqTjS/?igshid=YmMyMTA2M2Y=
त्याचे झाले असे की खली नुकताच एका कार्यक्रमासाठी पोहोचला होता. गाडीतून उतरताना त्याने प्रसारमाध्यमांना व चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले. सर्व काही सुरळीत चालले असताना एका चाहत्याने त्याला त्याच्या वाढदिवसाविषयी विचारले. हसतमुख चेहऱ्याने समोर आलेला खली अचानक या प्रश्नामुळे भावुक त्याने पलटत आपले अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. चाहत्यांनी याबाबत कारण विचारले असता खली काहीही न बोलता तेथून निघून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खली यावर्षी २७ ऑगस्ट रोजी आपल्या वयाची पन्नाशी पूर्ण करेल.
अखेर अफगाणिस्तानच्या हाती यश, आयर्लंडविरुद्ध सलग २ टी२० पराभवांनंतर उघडले खाते
एशिया कपमध्ये रोहित ठरणार ‘हिट’मॅन! एकाहून एक बड्या विक्रमांचे रचणार मनोरे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड