क्रिकेटविश्वामध्ये इंडियन प्रीमियर लीगला मिळालेल्या यशानंतर अनेक देशांनी टी20 स्पर्धेची सुरुवात केली. आयपीएलच्या सुरुवातीनंतर काही वर्षांनी पाकिस्तानने देखील टी20 स्पर्धेचे आयोजन केले. पाकिस्तानची ही टी20 स्पर्धा ‘पाकिस्तान सुपर लीग’ या नावाने खेळली जाते, ज्याचा यावर्षीचा उरलेला हंगाम यूएईमध्ये खेळला जात आहे. पाकिस्तान सुपर लीग पूर्णतः आयपीएलसारखी नाही. परंतु विदेशातील खेळाडू ही स्पर्धा खेळताना दिसून येतात. पाकिस्तान सुपर लीगकडे परदेशी खेळाडूंचा कल वेगाने वाढत आहे, ज्यात बरेच दिग्गज खेळाडू खेळत आहेत.
यावर्षीच्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) हंगामात आणखी काही परदेशी स्टार खेळाडू सामील झाले आहेत. तर आम्ही तुम्हाला या लेखातून त्या 5 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे पीएसएलमध्ये प्रथमच खेळत आहेत. (These 5 players from around the world will play in the Pakistan Super League First Time)
1) जेम्स फॉकनर- ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फोकनर मागील काही वर्षांपासून संघापासून दूर आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. परंतु तो वेगवेगळ्या टी-20 क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होताना दिसत आहे. टी20 क्रिकेटमध्ये आपला प्रभाव टाकत जेम्स फोकनर सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. तो पहिल्यांदाच पीएसएलमध्ये खेळताना दिसून येत आहे. जेम्स फोकनरला लाहोर कलंदर्स संघाने निवडले आहे.
2) शिमरोन हेटमायर- वेस्ट इंडीज संघाचा फलंदाज शिमरोन हेटमायर एक आक्रमक फलंदाज आहे. शिमरोन हेटमायर वेस्टइंडीजमध्ये मागील काही वर्षांपासून खेळत आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केल्यामुळे तो वेगवेगळ्या टी20 स्पर्धेत दिसून येत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा शिमरोन हेटमायर याने अनेक टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळल्या आहेत. परंतु त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये यापुर्वी सहभाग घेतला नव्हता. यावर्षी तो पाकिस्तान सुपर लीग 2021 मध्ये मुलतान सुलतान या संघाकडून खेळत आहे.
3) उस्मान ख्वाजा- ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलिया संघात स्वतःला सिद्ध केले आहे. उस्मान ख्वाजा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. परंतु सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या आंतरराष्ट्रीय संघापासून दूर आहेत. भलेही तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. परंतु घरच्या मैदानावरील स्पर्धा किंवा टी-20 स्पर्धा खेळताना दिसून येतात. उस्मान ख्वाजा याने बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये टी20 स्तरावर स्वतःला सिद्ध केले आहे.
टी20 क्रिकेटमध्ये ख्वाजाने जवळजवळ 100 सामने खेळलेले आहेत. परंतु पाकिस्तान सुपर लीग आतापर्यंत खेळली नव्हती. मात्र यंदा पहिल्यांदाच तो पीएसएल 2021 मध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाकडून खेळत आहे.
4) मार्टिन गप्टिल- न्यूझीलंड क्रिकेट संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल हासुद्धा आंतरराष्ट्रीय संघाकडून खेळत नाही. क्रिकेटच्या विश्वात मर्यादित षटकांचा किंवा विशेषत: टी20 क्रिकेटचा विचार केला तर, जागतिक क्रिकेटमधील मार्टिन गप्टिल हा एक मोठा आणि सुप्रसिद्ध चेहरा आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटबरोबरच गप्टिलने उर्वरित टी20 लीगमध्येही आपली चमक पसरविली आहे.
मार्टिन गप्टिल टी20 क्रिकेटचा तज्ज्ञ फलंदाज बनला आहे. ज्यामुळे त्याला बर्याच देशांच्या टी20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळते. तसेच तो यावर्षी प्रथमच पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसत आहे. गप्टिल प्रथमच या लीगचा एक भाग झाला आहे. या मोसमात कराची किंग्जने त्यांच्या संघात त्यांची निवड झाली आहे.
5) ब्रँडन किंग- वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना टी20 क्रिकेटमध्ये विशेष स्थान आहे. टी20 स्वरूपात वेस्ट इंडीजकडून एकापेक्षा एक खतरनाक खेळाडू मिळतात. वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजांची फौज आहे, ज्यात अलीकडेच एका तरुण खेळाडूने खूप प्रभावित केले आहे, त्याचे नाव ब्रँडन किंग आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमधून आपली छाप सोडणारा ब्रॅंडन किंगला यानंतर वेस्ट इंडीज संघात संधी मिळाली आणि बर्याच टी 20 लीगकडूनही ऑफर येऊ लागल्या आहेत. त्याचप्रमाणे आता तो पाकिस्तान सुपर लीगमध्येही प्रथमच खेळताना दिसणार आहे. ब्रॅंडन किंगचा समावेश इस्लामाबाद युनायटेडच्या संघात करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इथेही कोहलीच ‘किंग’! WTCच्या विजेत्या संघाची बक्षीस रक्कम, विराटच्या आयपीएल मानधनापेक्षाही कमी
लिटल मास्टरच्या मते, ६०-७०चे दशक गाजवणारे ‘ते’ दिग्गज आजही जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू
कर्णधार विलियम्सन कसोटीचा अंतिम सामना खेळणार का? दुखापतीबाबत आली महत्त्वाची अपडेट