सध्या क्रिकेटजगतात लिजेंड्स लीग क्रिकेटची चर्चा आहे. स्पर्धेचा दुसरा हंगाम यावर्षी भारतात खेळला जाईल. 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेत जगभरातील निवृत्त झालेले अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होतात. यापूर्वीच अनेक माजी खेळाडूंनी आपण स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. यामध्ये काही असेही खेळाडू आहेत ज्यांनी, भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, मात्र लवकर निवृत्त होत आता या लीगचा भाग झाले आहेत.
विराट कोहलीने नुकतीच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची 14 वर्ष पूर्ण केली. या काळात त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. मात्र, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण करून त्याच्या आधी निवृत्त झालेले काही खेळाडू आता लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील.
थिसारा परेरा-
श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा श्रीलंकेतील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक मानला जातो. परेरा जगभरातील वेगवेगळ्या संघांसाठी टी20 क्रिकेट खेळला आहे. परेराने श्रीलंकेसाठी 166 वनडे आणि 84 टी20 सामने खेळले होते. त्याने 2009 मध्ये भारताविरुद्ध कोलकाता येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. आता तोच परेरा यंदा लिजेंड्स लीग क्रिकेटचा भाग असणार आहे.
रिचर्ड लेव्ही
दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर रिचर्ड लेव्हीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ एका वर्षाचीच राहिली. त्याने फेब्रुवारी 2012 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याच वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी आपला अखेरचा सामना खेळला होता. दक्षिण आफ्रिकेकडून 13 टी20 सामने खेळलेल्या लेव्हीच्या नावावर एक शतकही आहे. त्याने 2014 मध्ये, कोलपॅक करार स्वीकारत काउंटी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले होते. आता हा फलंदाजही लिजेंड्स लीग क्रिकेटमध्येही खेळताना दिसणार आहे.
जेड डर्नबॅक
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेड डर्नबॅक हा देखील यंदा लिजेंड्स लीग क्रिकेट खेळताना दिसणार आहे. डर्नबॅकने 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडकडून वनडे आणि टी20 पदार्पण केले. त्याने इंग्लंड संघासाठी एकूण 24 वनडे आणि 40 टी20 सामने खेळले होते. 2019 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा डर्नबॅच यंदा ही लीग गाजवताना दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मिचेल स्टार्कने टाकला ‘तो’ चेंडू आणि पाकिस्तानच्या दिग्गजाचा 23 वर्ष जुना विक्रम मोडीत
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
अखेर वाद निवळला! दुखापतग्रस्त जड्डूसाठी सीएसकेने केले खास ट्विट