कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या आघाडीवर आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा डाव अवघ्या २९६ धावांवर कोसळला. ज्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या डावात आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाचे ५ फलंदाज चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात माघारी परतले. दरम्यान याच सामन्यात न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साउदीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
टीम साउदी हा न्यूझीलंड संघातील अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दरम्यान भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात देखील त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ५ गडी बाद केले होते. तर दुसऱ्या सामन्यात देखील त्याने चांगली कामगिरी केली आहे.दुसऱ्या डावात १७ धावा करून बाद होणारा मयांक अगरवाल हा त्याचा ५० वा बळी ठरला आहे.
भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मयांक अगरवाल टीम साऊदीने १७ धावांवर बाद करत माघारी पाठवले. यासह त्याने भारता आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटीमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे यांची बरोबरी केली आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी न्यूझीलंड संघाचा गोलंदाज रिचर्ड हेडली आहे. ज्याने सर्वाधिक ६५ गडी बाद केले होते. तसेच दुसऱ्या स्थानी बिशन बेदी आहेत, ज्यांनी ५७ गडी बाद केले होते.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
६५ गडी – रिचर्ड हेडली
५७ गडी – बिशन बेदी
५५ गडी – ईएएस प्रसन्ना
५५ गडी – आर अश्विन
५० गडी – अनिल कुंबळे
५० गडी – टीम साउदी*
महत्त्वाच्या बातम्या –
पुजाराला बाद करताच जेमिसनचा मोठा विक्रम, २० व्या शतकापासून ‘असा’ पराक्रम करणारा तिसराच
फुटलं ना डोकं! सीमारेषेवरून क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू थेट पंचाच्या डोक्यात, व्हिडिओ पाहाच
पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन स्पर्धेतून बाहेर, रचानोक इंतानोनने सेमीफायनलमध्ये केले पराभूत