टोकियो ऑलिंपिक २०२० च्या तिसऱ्या दिवशी भारताची सुरुवात काहीशी निराशाजनक ठरली. असे असले तरीही, भारतीय पुरुषांच्या नौकानयन संघाने शानदार प्रदर्शन केले आहे. अर्जुन लाट जाट आणि अरविंद सिंगच्या भारतीय जोडीन पुरुषांच्या नौकानयन लाईटवेट दुहेरी स्कल्स स्पर्धेत रेपेशाज फेरीत तिसऱ्या स्थानी राहून उपांत्य फेरीत एन्ट्री केली आहे.
या शर्यतीत अर्जुन बोअरच्या आणि अरविंद स्ट्रोकरच्या भूमिकेत होते. सुरुवातीला १००० मीटरपर्यंत भारतीय जोडी चौथ्या स्थानावर होती. मात्र, यानंतर जोडीने वेग वाढवला आणि शर्यतीत तिसरे स्थान मिळवले. (Tokyo Olympics Indian Rowers Good Play To Enter Semi Final of Mens Lightweight Double Sculls )
#IND rowers Arjun Lal and Arvind Singh have qualified for the SEMI-FINAL of Men's Lightweight Double Sculls after finishing 3️⃣rd in the repechage round! 🚣🚣#Rowing | #StrongerTogether | #UnitedByEmotion pic.twitter.com/Sn6mX0SWnw
— Olympic Khel (@OlympicKhel) July 25, 2021
हीट सामन्यात झाला होता भारताचा पराभव
यापूर्वी शनिवारी (२४ जुलै) दुसऱ्या हीटमध्ये उतरलेली भारतीय जोडी सहा संघांच्या स्पर्धेत ६.४०.३३ या वेळेसह पाचव्या स्थानी होती. तसेच त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नव्हते. तरीही या स्पर्धेत खालील रँकिंगच्या संघांना रेपेशाज फेरीतून उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची आणखी एक संधी मिळते.
अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंगची भारतीय जोडी टोकियोमध्ये आयोजित आशिया/ओशियाना कॉन्टिनेन्टल क्वालिफाइंग रेगाट्टा स्पर्धेच्या अंतिम शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. आपल्या या कामगिरीच्या जोरावर ते ऑलिंपिकमध्ये पात्र ठरले.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ