वनडे क्रिकेट सुरु होऊन आता जवळपास ५० वर्ष झाली. तसा हा क्रिकेटचा एका अर्थाने नवाच प्रकार. यात अनेक विश्वविक्रही आपण पाहिले. धावांचे, विकेट्स किंवा क्षेत्ररक्षणाचे अनेक विक्रम आपण या प्रकारात पाहिले.
क्रिकेटपटू जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात करतो तेव्हा तो कसोटी क्रिकेट खेळणे, एकतरी शतक करणे, कर्णधार होणे किंवा देशाची जर्सी एकदा तरी घालणे ही स्वप्न तर पहातोच परंतु हे सगळं करताना आपली कारकिर्द मोठी राहिली पाहिजे किंवा आपल्याला जास्त काळ क्रिकेट खेळता आले पाहिजे याचाही तो विचार करतो. Top 5 players with the longest ODI careers.
चांगल्या क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय कारकिर्द ही सरासरी १०-१२ वर्षांची असते. एवढ्या काळात ते चांगलं क्रिकेट व उच्च दर्जाचं क्रिकेट खेळतात. अनेक तज्ञांच्या मते फलंदाजाची कारकिर्द ही ३०-३२मध्ये बहरते. तो या काळात अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी करतो. असे असले तरीही अनेक फलंदाज असेही असतात ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळले आहे.
कसोटीत आजपर्यंत ३०१३ खेळाडूंनी भाग घेतला. यातील १७ खेळाडू हे २० वर्षांपेेक्षा जास्त क्रिकेट खेळले. वनडेत २६११ खेळाडूंनी भाग घेतला असून त्यातील १३ खेळाडूंचे करियर हे १८ वर्षांपेक्षा जास्त राहिले.
या लेखात आपण जे क्रिकेटपटू वनडेत १९ वर्षांपेक्षा जास्त क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंची माहिती घेऊया
१. सचिन तेंडुलकर:
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताकडून २२ वर्ष ९१ दिवस वनडे क्रिकेट खेळला आहे. या कारकिर्दीत त्याने ४६३ सामने खेळले आहे आहेत. त्याचबरोबर त्याने ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. तर नाबाद २०० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो ४१ वेळा नाबाद राहिला आहे.
गोलंदाजी करताना त्याने १५४ बळी घेतले आहे. यात २ वेळा त्याने ५ बळी घेतले आहेत. तर एका डावात ३२ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोच्च गोलंदाजी आहे. सचिनने १८ डिसेंबर १९८९ ला पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. तसेच तो १८ मार्च २०१२ ला पाकिस्तान विरुद्धच शेवटचा वनडे सामना खेळला होता.
२. सनथ जयसूर्या:
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्या श्रीलंकेकडून २१ वर्ष १८४ दिवस वनडे क्रिकेट खेळला आहे. त्याने वनडे कारकिर्दीत ४४५ सामने खेळले आहेत. यात त्याने २८ शतके आणि ६८ अर्धशतकांसह १३४३० धावा केल्या आहेत. १८९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
त्याचबरोबर ३२३ बळी घेतले आहेत. एका डावात २९ धावांत ६ बळी घेण्याची त्याची सर्वोच्च गोलंदाजी आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध २६ डिसेंबर १९८९ ला वनडे पदार्पण केले होते. तर तो २८ जुन २०११ ला शेवटचा वनडे सामना खेळला आहे.
३. जावेद मियांदाद:
पाकिस्तान संघातील एकेकाळचा महान फलंदाज जावेद मियांदाद हा पाकिस्तानकडून २० वर्ष २७२ दिवस वनडे क्रिकेट खेळला. त्याने २३३ वनडे सामने खेळले असून ८ शतके आणि ५० अर्धशतके केली आहेत. त्याने वनडेत ७३८१ धावा केल्या आहेत. नाबाद ११९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने याबरोबरच ७ बळीही घेतले आहेत.
त्याने विंडीज विरुद्ध ११ जून १९७५ ला वनडे पदार्पण केले होते तर ९ मार्च १९९६ ला भारताविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता.
४. ख्रिस गेल:
वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार व स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने ११ सप्टेंबर १९९९ रोजी भारताविरुद्ध टोरोंटो येथे पदार्पण केले. त्याने शेवटचा वनडे सामना हा १४ ऑगस्ट २०१९ रोजी खेळला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. परंतु त्याने वनडे किंवा टी२० निवृत्तीच्या बातम्या पाठीमागेच फेटाळून लावल्या आहेत. त्याने खेळलेल्या शेवटच्या वनडे सामन्याचा विचार करता त्याची वनडे कारकिर्द ही १९ वर्ष ३३७ दिवसांची राहिली आहे. यात त्याने ३०१ वनडेत १०४८० धावा व १६७ विकेट्स घेतल्या आहेत.
५. शोएब मलिक:
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार राहिलेल्या शोएब मलिकने १४ ऑक्टोबर १९९९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध शारजाह येथे पदार्पण केले. त्याने शेवटचा वनडे सामना हा १६ जून २०१९ रोजी खेळला आहे. त्याने कसोटी व वनडेत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याची वनडे कारकिर्द ही १९ वर्ष २४५ दिवसांची राहिली आहे. यात त्याने २८७ वनडेत ७५३४ धावा व १५८ विकेट्स घेतल्या आहेत.
६. अरविंदा डी सिल्वा
श्रीलंका संघाचा मनोरंजक पण महान खेळाडूंपैकी एक असणारा अरविंदा डी सिल्वा श्रीलंकेकडून १८ वर्ष ३५२ दिवस वनडे क्रिकेट खेळला. त्याने १९९६ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात शतक केल्याने क्रिकेट इतिहासात त्याचे नाव कोरले गेले. त्याने ३०८ सामने खेळताना ९२८४ धावा केल्या आहेत. यात ११ शतके आणि ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची १४५ धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच त्याने १०६ बळीही घेतले आहेत.
त्याने न्यूझीलंड विरुद्ध ३१ मार्च १९८४ ला वनडे पदार्पण केले होते. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध १८ मार्च २००३ ला शेवटचा वनडे सामना खेळला होता.
७. जॅक कॅलिस:
दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू जॅक कॅलिस १८ वर्ष १८४ दिवस वनडे क्रिकेट खेळला आहे. त्याने ३२८ सामने खेळले आहेत. यात त्याने १७ शतके आणि ८६ अर्धशतकांसह ११५७९ धावा केल्या आहेत. १३९ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
त्याचबरोबर गोलंदाजी करताना ३२८ सामन्यात २७३ बळी घेतले आहेत. यात ३० धावात ५ बळी ही त्याची सर्वोच्च गोलंदाजी आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध ९ जानेवारी १९९६ ला वनडे पदार्पण केले तसेच १२ जुलै २०१४ ला श्रीलंका विरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण