पुणे । भारतातील उत्कृष्ट युवा खेलाडूंपैकी उत्कर्ष गुप्ता आणि सेलेना सेल्वाकुमार हे खेळाडू अल्टीमेट टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र युनायटेड संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. दिल्लीचा आश्वासक तरुण खेळाडू उत्कर्ष हा वयाच्या चौथ्या वर्षापासुन टेबल टेनिस खेळत आहे तर चेन्नईच्या सेलेनाने वयाच्या सातव्या वर्षी टेबल टेनिस खेळात पदार्पन केले.
मौसमापुर्वी ड्राफ्टमध्ये उत्कर्ष हा महाराष्ट्र युनायटेड संघाचा आठव्या फेरीतील पहिला पीक खेळाडू आहे तर सेलेना सातव्या फेरीतील दुसरी पीक खेळाडू आहे.
सेलेनाने इजिप्त येथे झालेल्या इजिप्त जुनिअर आणि कॅडेट टेबल टेनिस ओपन स्पर्धेत कनिष्ठ गटातील सुवर्णपदक पटकावले तसेच, संघिक गटातही विजेतेपद पटकालवे. शर्म एल शेख स्पर्धेत सेलेनाने कॅडेट गटात एकेरी व दुहेरी अशा दोन्ही गटात विजेतेपद पटकावले.
भारताची अव्वल मानांकीत महिला युवा खेळाडू असलेली सेलेना म्हणाली की, या स्पर्धेचा हा दुसरा मौसम आहे ज्यामध्ये मी खेळत आहे. त्यामुळे स्वत:ची कामगिरी सिध्द करण्यासाठी मला अधिक संधी मिळाली आहे.
भारताचा सहाव्या क्रमांकाचा अत्कर्ष युटीटी स्पर्धेत क्रिस्टीन कार्लसन, जोओ मोंटेरीओ, ऍथोनी अमलराज यांच्याप्रमाणे आपला ठसा उमटविन्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी उत्कर्ष म्हणाला की, माझ्या संघातील इतर खेळाडूंकडून विविध गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीन. माझे मानांकनात सुधारणा करेल.
हे दोन्ही खेळाडू केवळ एका महाराष्ट्र युनायटेड या संघात खेळत नसून त्यांची कारकिर्दही समान आहे. अत्कर्षचे वडिल त्याचे प्रशिक्षक होते तसेच सेलेनाची आई अनेक वर्षांपासून दिवसातले दोन तास तीचा नित्य सराव घेत असते.
दोन्ही खेळाडू या मौसमात महाराष्ट्र युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहेत. संघाची कामगिरी उंचाविण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.