आज(4 मार्च) आयसीसीने महिला टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत भारताची स्टार क्रिकेटपटू शेफाली वर्माने गरुड झेप घेतली आहे. तिने तब्बल 19 स्थानांची झेप घेत अव्वल क्रमांक पटकावला आहे.
ती फलंदाजांच्या क्रमावारीत न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत 761 गुणांसह अव्वल क्रमांकावर आली आहे. बेट्स 750 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. बेट्स ऑक्टोबर 2018पासून अव्वल क्रमांकावर होती. तिने ऑक्टोबर 2018मध्ये वेस्ट इंडीजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला होता.
विशेष म्हणजे 16 वर्षीय शेफाली आयसीसी महिला टी20 क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवणारी मिताली राज नंतरची केवळ दुसरीच भारतीय क्रिकेटपटू आहे.
तिने सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. या विश्वचषकात आतापर्यंत शेफालीने आक्रमक खेळताना अनुक्रमे 29 ,39,46 आणि 47 अशा धावा केल्या आहेत.
तसेच आज आयसीसीने जाहीर केलेल्या आयसीसी महिला टी20 क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत शेफाली व्यतिरिक्त पहिल्या 10 जणींमध्ये जेमिमाह रोड्रिगेज आणि स्म्रीती मंधना या भारतीय फलंदाज आहेत. मात्र या दोघींचीही क्रमवारीत 2 स्थानांनी घसरण झाली आहे. मंधना 6 व्या क्रमांकावर तर रोड्रिगेज 9 व्या क्रमांकावर घसरली आहे.
Shafali Verma has risen a remarkable 19 places to claim the top spot among batters.
She's just 18 T20I matches and 16 years old 🤯@MRFWorldwide | #ICCRankings pic.twitter.com/CfTYSnaNIc
— ICC (@ICC) March 4, 2020
तसेच गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडची फिरकीपटू सोफी इक्लेस्टोन ऑस्ट्रेलियाच्या मेगन शटला मागे टाकत अव्वल क्रमांकावर आली आहे. तिने सध्या सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात एकूण 8 विकेट्स घेतल्या आहेत. यातील 3 विकेट्स तिने वेस्ट इंडिज विरुद्ध केवळ 7 धावा देत घेतल्या होत्या.
तसेच ती अन्या श्रबसोल नंतर टी20 महिला क्रमवारीत अव्वल क्रमांकावर येणारी इंग्लंडची पहिली गोलंदाज आहे. अन्या एप्रिल 2016 ला गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर होती.
याबरोबरच भारतीय गोलंदाजांमध्ये टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारी पूनम यादवने क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. तिने 4 स्थानांची झेप घेत 8 वे स्थान मिळवले आहे. मात्र राधा यादव आणि दीप्ती शर्माची क्रमवारीत घसरण झाली आहे. दीप्ती 1 स्थानाने खाली येत 5 व्या क्रमांकावर आली आहे. तर राधाची 3 स्थानांनी घसरण झाली असून ती आता 7 व्या क्रमांकावर आली आहे.
⬆️ Sophie Ecclestone
⬆️ Amelia Kerr
⬆️ Georgia WarehamYoung spin-bowling stars of the #T20WorldCup are taking the rankings charts by storm 🔥 @MRFWorldwide | #ICCRankings pic.twitter.com/J2ryRpCtST
— ICC (@ICC) March 4, 2020
त्याचबरोबर अष्टपैलू क्रमवारीत न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन अव्वल क्रमांकावर कायम आहे. या यादीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये भारताची केवळ दीप्ती शर्मा आहे. तीने 9 स्थानांची झेप घेत या क्रमवारीत 7 वे स्थान मिळवले आहे. ती पहिल्यांदाच पहिल्या 10 अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.
↔️ Sophie Devine
⬇️ Ellyse Perry
↗️ Dane van Niekerk
↗️ Deepti SharmaDevine retains the top spot in the @MRFWorldwide T20I Rankings for all-rounders. pic.twitter.com/hqzyiWmKXR
— ICC (@ICC) March 4, 2020
अन्य खेळाडूंमध्ये श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू फलंदाजांच्या क्रमवारीत 18 व्या स्थानावरुन 14 व्या स्थानावर आली आहे. इंग्लंडची नेट स्कीव्हर पुन्हा एकदा पहिल्या दहामध्ये परतली आहे, तर इंग्लची कर्णधार हेदर नाइट प्रथमच अव्वल 15 जणींमध्ये आली आहे.
गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडची लेगस्पिनर एमेलिया केर दोन स्थानांची पुढे येत चौथ्या स्थानावर आली आहे तर ऑस्ट्रेलियाची लेगस्पिनर जॉर्जिया व्हेहायम नऊ स्थानांनी पुढे येत दहाव्या स्थानावर विराजमान झाली आहे.
महिला संघ क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 290 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड (278), तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड (271) चौथ्या क्रमांकावर भारत (266) आणि पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका(247) आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–तब्बल १३ वर्षांनंतर बंगाल रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात
–न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली पण आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान राखले
–टीम इंडिया नक्कीच वर्ल्डकप फायनलमध्ये पोहचेल, या ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा विश्वास