भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना,लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
नुकताच भारताने लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना जिंकल्याने विराट कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे. याबाबतीत त्याने वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांना देखील मागे टाकले आहे.(Virat Kohli became the 4th captain to win most test as a captain)
मोठ्या विक्रमाला घातली गवसणी
विराट कोहलीच्या नावे आता कर्णधार म्हणून ३७ कसोटी सामने जिंकण्याची नोंद झाली आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी ग्रॅमी स्मिथ आहे. त्याच्या नावे सर्वाधिक ५३ विजयांची नोंद आहे. तसेच दुसऱ्या स्थानी रिकी पाँटिंग आहे, ज्याला ४८ कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर तिसऱ्या स्थानी स्टीव्ह वॉ आहेत, ज्यांना ४१ कसोटी सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते.
तसेच क्लाईव्ह लॉईड यांचा ३६ कसोटी सामन्यांतील विजय मिळवण्याचा विक्रम मोडून विराट कोहली आता सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या कर्णधारांमध्ये चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. विराटने आत्तापर्यंत ६३ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून त्यातील ३७ सामने जिंकले आहेत, तर १५ सामने गमावले आहेत. त्याचबरोबर ११ सामने अनिर्णीत राहिले आहेत.
भारतीय संघाचा १५१ धावांनी मिळवला विजय
या सामन्यात इंग्लंड संघाला विजय मिळवण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज नियमित कालांतराने माघारी परलते होते. कर्णधार जो रूटने एकहाती झुंज देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला देखील मोठी खेळी खेळता आली नाही, तो अवघ्या ३३ धावा करत माघारी परतला.
त्यानंतर जोस बटलरने शेवटी २५ धावांची खेळी केली. परंतु, त्याला देखील हा सामना वाचवता आला नाही. अखेर भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक गोलंदाजी समोर इंग्लिश फलंदाजांचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे १२० धावांत कोसळला. हा सामना भारतीय संघाने १५१ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या –
अरर! जो रुटचे शतक होऊनही इंग्लंडवर पहिल्यांदाच ओढवली ‘अशी’ नामुष्की
टीम इंडियाचा मायदेशाबाहेर ‘या’ मैदानांवर राहिलाय दबदबा, इंग्लंडच्या लॉर्ड्सचाही समावेश