रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान फेसबुकवर सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू ठरला आहे. आयपीएल प्लेऑफ एलिमिनेटरमध्ये विराटचा बेंगलोर संघ स्पर्धेतून बाहेर पडला, परंतु फेसबुकवर त्याच्या नावाची चर्चा सर्वाधिक होती.
विराट कोहली अव्वलस्थानी, तर एमएस धोनी दुसऱ्या
फेसबुकवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूंच्या यादीत विराटचे नाव आहे. चेन्नईचा कर्णधार धोनीचा संघ आणि त्याची स्वत:ची कामगिरी निराशाजनक होती, तरीही प्रसिद्ध खेळाडूंच्या यादीत धोनी दुसर्या क्रमांकावर होता. तिसऱ्या स्थानी विजयी कर्णधार रोहित शर्मा, मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पंड्या चौथ्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल पाचव्या क्रमांकावर आहे.
आयपीएल संघांमध्ये मुंबईचीच सर्वाधिक चर्चा
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा 13 वा हंगाम 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएई येथे खेळला गेला. यादरम्यान, फेसबुकवर मुंबई इंडियन्स संघाची सर्वाधिक चर्चा झाली. पाचव्यांदा विजयी होण्याचा बहुमान मुंबईला मिळाला आहे. आयपीएलशी संबंधित एक कोटी पोस्ट मुंबई संघाशी निगडित पोस्ट झाल्याचे फेसबुकने एक आकडेवारी जाहीर करीत सांगितले आहे. आयपीएलबद्दल चर्चा करणारे सुमारे 74 टक्के लोक हे 18 ते 34 वयोगटातील होते.
इतर संघांचे स्थान
आठ आयपीएल संघांपैकी मुंबईचा संघ फेसबुकवर सर्वाधिक चर्चेत होता. त्यानंतर विराटच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा क्रमांक लागतो. उपविजेता दिल्ली कॅपिटल्स चौथ्या, तर शाहरुख खानचा कोलकाता नाईट रायडर्स संघ पाचव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल २०२१ साठी केव्हा होणार लिलाव? बीसीसीआयने दिली फ्रेंचायजीना माहिती
-राहुल द्रविडने सांगितले, मुंबई इंडियन्सच्या यशामागील ‘हे’ आहे खरे कारण
-“धोनी आयपीएल २०२१ ला चेन्नईचे कर्णधारपद सोडेल”, या दिग्गजाचे मोठे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
-ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
-सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
-भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर