मुंबई । भारतीय कर्णधार विराट कोहली हा जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजामध्ये समावेश होतो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो एक किंग आहे. तिन्ही प्रकारात विराटची सरासरी पन्नासपेक्षा जास्त आहे. पन्नासपेक्षा जास्त सरासरी असणारा जगातला एकमेव खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. आज तो जगातला सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू आहे. दमदार कामगिरी करत सतत चर्चेत राहणार्या विराटला अनेकदा टीकेचा सामना देखील करावा लागला.
विराट कोहली आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. मात्र त्यांचे हे विधान लोकांना पचनी पडत नाही. 2018 साली विराटने आपल्या जन्मदिवशी एक वादग्रस्त विधान केले होते. ज्यांना विदेशातले फलंदाज पसंत आहेत त्यांनी भारत सोडून जायला हवे असे विधान केले होते.
विराट कोहलीने आपल्या जन्म दिली ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आलेले संदेश वाचत होता त्यात एक संदेश आला होता. ज्यामध्ये एका क्रिकेट फॅन्सने त्याला ओव्हररेटेड खेळाडू संबोधले. युजरने लिहिले की, “आपण ओव्हररेटेड खेळाडू आहात. वैयक्तिकरित्या मला आपल्यात काही खास वाटत नाही. मला भारतीय फलंदाज ऐवजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आवडतात.”
त्यानंतर विराटने एक वादग्रस्त विधान केले. यामुळे सोशल मीडियावर चांगलेच युद्ध रंगले. विराट कोहलीने त्या फॅनला उत्तर दिले की, मला वाटते आपण भारतात राहायला नको कुठेतरी दुसरीकडे राहायला हवे. तुम्ही आमच्या देशात राहून अन्य देशातील खेळाडूंना पसंत करता. तुम्हाला मी आवडत नाही या बाबतीत माझे काही दुमत नाही. आपण आमच्या देशात राहून अन्य काही गोष्टींना देखील पसंती दिली पाहिजे.”
विराटच्या या विधानाने एका झटक्यात त्याला व्हिलन बनवण्यात आले. क्रिकेट फॅन्स त्याला ट्रोल करू लागले. एका यूजरने लिहीले होते की, “आपण नेहमी विदेशात तयार झालेल्या वस्तूंचे प्रमोशन करता. तसेच आपण लग्न देखील इटलीमध्ये केले आणि आपण भारतीय वस्तू अथवा गोष्टी पसंत असायला हव्या असे सांगत आहात.”
वास्तविक पाहता विराट कोहली एका विदेशी खेळाडूला आदर्श मानतो. 19 वर्षांखालील झालेल्या विश्वचषकात कोहलीने हर्शल गिब्स हा त्याचा आदर्श खेळाडू असल्याचे सांगितले होते. त्याबद्दल त्याला अनेकदा टीकेचा सामना देखील करावा लागला.