नवी दिल्ली| रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नुकतेच त्याने ट्विटरवर एक खास छायाचित्र शेअर केले आहे. त्या छायाचित्रामध्ये त्याच्याव्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, अनुभवी फलंदाज एबी डिविलिअर्स, युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल दिसत आहे. छायाचित्रावरून शाळेच्या दिवसांची आठवण आली असे विराटने सांगितले.
हे छायाचित्र ट्विटरवर शेअर करताना विराटने लिहिले की, “हे चित्र पाहून मला शाळेतले दिवस आठवले. ही एका वर्गातली 4 मुले आहेत आणि एबी डिविलिअर्स असा मुलगा आहे ज्याने गृहपाठ पूर्ण केला आहे आणि इतर तीन मुलांची अडचण वाढली आहे.”
This pic takes me back to school days. 4 guys from the same class, and AB is the kid who's finished homework and is prepared and the other 3 know they are in trouble 😂 pic.twitter.com/KmJ1XtAUJa
— Virat Kohli (@imVkohli) October 22, 2020
यावर फिरकीपटू राशिद खान आणि युजवेंद्र चहल यांनी एक मजेदार टिप्पणी केली आहे, जी लोकांना खूप आवडली. सनरायझर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान याने लिहिले आहे की, “शिक्षकाने गृहपाठ दिला आहे हे सिराजलाही माहिती नाही.”
And Siraj is like even don’t know that teacher given us a homework 😂😂😂
— Rashid Khan (@rashidkhan_19) October 22, 2020
दुसरीकडे, युजवेंद्र चहलने लिहिले आहे की, “गृहपाठ तपासला जाईल म्हणून मी शाळेला दांडी मारली आहे.”
चहलने यासह हसणारे इमोजी शेअर केले आहे.
बुधवारी (21ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 8 गडी राखून पराभूत केले होते. कोलकाताने दिलेले 84 धावांचे लक्ष्य 13.3 षटकांत पूर्ण करून बेंगलोरने हा सामना जिंकला होता. वेगवान गोलंदाज सिराजने दोन निर्धाव षटकांसह 8 धावांत 3 गडी बाद केले होते. फिरकीपटू चहलने दोन गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
CSK चाहत्यांनो नाराज होऊ नका! अजूनही चेन्नई पोहचू शकते प्लेऑफमध्ये, अशी आहेत समीकरणे
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरु
“आर्चरने तिसरे षटक फेकले असते तर…”, राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर मनीष पांडेची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख –
स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतानाही सामना पाहाताना कोठून येतो त्यांचा आवाज? घ्या जाणून
नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज