दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी२० संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार केला होता. तर दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. आता तो कुठल्याही संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार नाहीये. तरीदेखील जाहिरात विश्वात याचा कुठलाही परिणाम दिसून आला नाहीये.
विराट कोहलीने (Virat Kohli) क्रिकेटच्या तीनही स्वरूपातील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तरीदेखील तो अजूनही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि महगडा सेलिब्रिटी ब्रँड आहे. आता सध्या त्याची ब्रँड वॅल्यू २४ कोटी डॉलर्स इतकी (brand value of Virat Kohli) आहे. जाहिरात विश्वात तो एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकरच्या कॅटेगरीमध्ये आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला आहे. तरीदेखील त्यांच्या ब्रँड वॅल्यूवर कुठलाही परिणाम जाणवलेला नाहीये.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव
वर्ष २०१९ मध्ये विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर एमएस धोनीची ब्रँड वॅल्यू वाढली होती. ही ब्रँड वॅल्यू ४ कोटी डॉलर्सच्या पुढे गेली होती. जाहिरात विश्वातील तज्ञांचे म्हणणे आहे की, सचिन तेंडुलकर जेव्हा खेळायचा तेव्हा सोशल मीडियाचा वापर इतका नव्हता, तर आजच्या युगात सोशल मीडियाचा ब्रँडवर प्रभाव पाडण्यात मोलाचा वाटा आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान घडलेली प्रत्येक घटना सेलिब्रिटीच्या प्रतिमेशी जोडलेली असते. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान कोहलीचे वागणे देशातील अनेकांना आवडले नाहीये.
‘हरेश बिजुर कन्सल्टंट’चे हरेश बिजुर यांनी म्हटले की, “ब्रँड एंडोर्समेंट टॉप वर असलेल्या लोकांनुसार बदलत असते. क्रिकेटमध्ये ते कर्णधारावर अवलंबून असते. जर तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळत नसाल किंवा चांगली कामगिरी करत नसाल तर तुमच्याकडे फक्त जुने ब्रँड्सच उरतात. जर आपण नवीन ब्रँड एंडोर्समेंटबद्दल बोलत असलो, तर विराट कोहली आणि नवीन कर्णधार यांच्यातील योग्य व्यक्तीची निवड केल्यानंतरच जाहिरात कंपनी निर्णय घेईल.”
सध्या विराट कोहलीकडे ३० पेक्षा अधिक ब्रँड्स आहेत. २०१७ मध्ये त्याने १० वर्षांसाठी १ जर्मनीची स्पोर्ट्स ब्रँड कंपनी प्युमासोबत ११० कोटी रुपयांची डील केली होती. प्युमा इंडियाचे एमडी अभिषेक गांगुली यांनी म्हटले की, ‘भारतीय कर्णधार म्हणून तो एक चांगला लीडर राहिला आहे. तसेच एक खेळाडू म्हणून देखील चांगली कामगिरी केली आहे.’
महत्वाच्या बातम्या:
‘बीसीसीआयचा विराटवर कसलाही दबाव नव्हता, पण…’, बीसीसीआय कोषाध्यक्ष धुमाळांचे स्पष्टीकरण
‘ऍशेस’ खिशात घालत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी कायम, तर इंग्लंड तळाला घसरले; पाहा WTC गुणतालिका
हे नक्की पाहा: