भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली मागील जवळपास दोन वर्षापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. तो चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतोय. तब्बल १००० पेक्षा जास्त दिवसांपासून त्याने आंतरराष्ट्रीय शतक झळकावले नाही. विराटला या खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटू सल्ला देत आहेत. स्वतः विराटही अपार मेहनत घेताना दिसतोय. या सर्वांच्या व्यतिरिक्त आता विराटने त्याची बॅटही बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
विराट २०१७ पासून एका प्रसिद्ध टायर बनवणाऱ्या कंपनीने प्रायोजित केलेली बॅट वापरतो. आपल्या बॅटवर त्या कंपनीचे स्टिकर लावण्यासाठी विराटने २०१७ मध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा करार केला होता. हा करार २०२५ पर्यंत असेल. सध्याच्या कंपनीच्या ‘जीनियस रेड’ या एडीशनची बॅट विराट वापरतो. आता कंपनीने ‘विझार्ड गोल्ड’ या नावाच्या बॅटचे नवे एडिशन आणले आहे. त्यामुळे विराट आता आशिया चषकात हीच नवी बॅट घेऊन उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या नव्या बॅटमुळे तरी त्याचा फॉर्म बदलेल, अशी आशा त्याचे चाहते व्यक्त करत असतील.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1562075432362553344?t=Zm1lwn4-KMB5GtiPK8jghw&s=19
विराट कोहली आयपीएलनंतर केवळ इंग्लंड दौऱ्यावर खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील मालिका, वेस्ट इंडिज दौऱ्यावरही तो सहभागी झाला नव्हता. आता तो थेट आशिया चषकात खेळताना दिसेल. त्याचा हाच फॉर्म आशिया चषकात राहिला तर, टी२० विश्वचषकासाठी त्याचा संघात समावेश होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण, संधी मिळत असलेले इतर युवा खेळाडू सरस कामगिरी करताना दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…