इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल)चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसतो, मात्र अधून-मधून तो एखादी पोस्ट करतो. यातच त्याने शनिवारी (24 सप्टेंबर) फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. जी काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू होण्यासाठी अद्याप सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. मात्र, आतापासूनच आयपीएलच्या या नव्या पर्वाची तयारी सुरू झाल्याचे दिसतेय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) आयपीएलबाबत एक महत्त्वाची बैठक झाली असून, त्यामध्ये आयपीएलच्या पुढील हंगामाबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. अशातच सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीची पोस्ट व्हायरल होत आहे.
धोनी या फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी 25 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता लाईव्ह (थेट प्रक्षेपण) येणार आहे आणि यावेळी मी एक रोमांचक बातमी शेयर करणार आहे. तुम्ही सगळे उपस्थित असाल अशी आशा आहे.”
धोनीने दोन वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र तो आयपीएलमध्ये खेळतो. त्याने केलेल्या पोस्टने चाहते उत्सुक झाले आहेत. काहींनी ही माहिती जाहीरातीबाबत असेल असे तर्कवितर्क लावले असून धोनी असे खूपच कमीवेळा करतो. यामुळे धोनीचे चाहते रविवारचे दुपारचे दोन कधी वाजणार याची वाट पाहत आहेत.
धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तो क्रिकेटविश्वातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याने भारताचे नेतृत्व करताना 2007 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2011मध्ये वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. तसेच त्याने 2013च्या विजेत्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचे कर्णधारपद भुषविले होते. त्याने 90 कसोटी सामने खेळताना 4876 धावा केल्या आहेत. तर 350 वनडे सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1617 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2023चा हंगाम जुन्या पद्धतीने खेळला जाणार आहे. याचा अर्थ संघ आता घरच्या आणि विरोधी संघांच्या मैदानावर खेळणार आहेत. यामुळे धोनी पुन्हा एकदा चेन्नईमध्ये खेळताना दिसणार आहेत. यासाठी कधी एकदाचा आयपीएल 2023 सुरू होतो याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फिनिशींगचे काम डिकेचेच’, कॅप्टन रोहितचा सामन्यानंतर चकीत करणारा खुलासा
विराटच्या एका इशाऱ्यावर नागपूर स्टेडियम ‘गप-गार’, चाहत्यांच्या ‘या’ कृत्यामुळे भडकला माजी कर्णधार
रॉजर फेडररचा इमोशनल बाय-बाय! राफेल नदाल, नोवाक जोकोविच यांना देखील अश्रू अनावर