कोणत्याही क्षेत्राची आवड असणे गरजेचे असते. तेव्हा वय कितीही असो त्याचा काही फरक पडत नाही. हे सिद्ध केले आहे, केवळ 3 वर्षीय लहान मुलाने. ज्याचे नाव आहे शेख शाहिद. शाहिदने काही महिन्यांपूर्वी डायपर घालून स्वत:च्या घरात क्रिकेट खेळताना फटकार लावले होते.
तेव्हा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहुन मायकल वॉ, केविन पीटरसन आणि ब्रॅड हॉग हे दिग्गज खेळाडूही दंग झाले होते. या खेळाडूंनी शाहिदला क्रिकेटचे भविष्य सांगितले होते.
त्याचबरोबर आता बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) शाहिदला (Sheikh Shahid) क्रिकेटसाठी तयार करण्यास सांगितले आहे. गांगुलीने शाहिदला सराव करण्यासाठी क्रिकेट मैदानापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
खरं तर 3 वर्षीय शाहिदला गांगुलीच्या क्रिकेट अकादमीमध्ये कोलकाता येथे प्रवेश मिळाला आहे. शाहिदचे प्रशिक्षक अमित चक्रवर्तीने याची माहिती देताना सांगितले की, 21 मार्चला शाहिदबरोबर अकादमीमध्ये येण्यास सांगितले आहे.
इतकेच नाही तर गांगुलीने शाहिदला त्याच्या प्रसिद्ध गेम शो ‘दादागिरी अनलिमिटेड’ मध्ये खास पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ (Steve Waugh) सुद्धा शाहिदचे चाहते झाले आहेत.
स्टीव्ह वॉ मागील काही दिवसांपूर्वी शाहिदला भेटण्यासाठी त्याच्या कोलकातातील घरी गेले होते. तसेच ते आता आपल्या पुस्तकामध्ये शाहिदचा उल्लेख करणार आहेत.
https://www.instagram.com/p/B6AclkvlwWM/
इतकेच नाही तर गांगुलीने शाहिदच्या फलंदाजीची कसोटीही घेतली. यावेळी गांगुलीने शाहिदला सुरुवातीचे 3 चेंडू टाकले. परंतु यावर शाहिदला एकही फटकार मारता आला नाही. त्यानंतर गांगुलीने शाहिदला म्हणाला की, “तू शॉट मार, मला तुझी फलंदाजी पहायची आहे.”
यानंतर शाहिदने गांगुलीच्या चेंडूवर शॉट मारले. शाहिदची फलंदाजी पाहून गांगुलीला खूप आनंद झाला.
ट्रेंडिंग बातम्या-
–संपुर्ण यादी: आजपर्यंतचे सर्व रणजी ट्राॅफी विजेेते व उपविजेते
–हा खेळाडू आपल्या देशाकडून खेळलाय दोन वेगवेगळ्या खेळांचे विश्वचषक
–स्टँडमध्ये गेलेला बॉल आणणार कोण? क्रिकेटपटूंसमोर मोठा प्रश्न