परदीप नरवालने प्रो कबड्डीत ‘सुपर टेन’चे अर्धशतक पूर्ण करताच रचला इतिहास

प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये मंगळवारी (४ सप्टेंबर) बेंगळुरू बुल्स विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात बेंगळुरू बुल्सने ४०-३९ असा विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

पटना पायरेट्सचा जरी या लढतीत पराभव झाला असला तरी त्यांचा कर्णधार परदीप नरवालने प्रो कबड्डीमध्ये सुपर टेनचे अर्धशतक पूर्ण करत एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला. प्रो कबड्डीत ५० सुपरटेन पूर्ण करणारा परदीप नरवाल पहिलाच खेळाडु ठरला.

मंगळवारच्या सामन्यांत प्रदीप नरवालने १४ गुण मिळवत ५० वा सुपर टेन पूर्ण केला. परदीप नरवालने ही कामगिरी ९७ सामन्यांत पूर्ण केली. सीजन ७ मध्ये परदीप नरवाल जरी नवनवीन विक्रम करत असला तरी त्याला संघातील खेळाडूंचा सहकार्य मिळत नसल्यामुळे पटना पायरेट्स गुणतालिकेत १२ व्या स्थानी आहे.

प्रो कबड्डीत सर्वाधिक सुपरटेन करणारे कबड्डीपटू – 

परदीप नरवाल – ५० सुपरटेन (९७)

राहुल चौधरी – ३८ सुपरटेन (११३)

अजय ठाकूर – २९ सुपरटेन (११४)

दीपक हुडा – २७ सुपरटेन (११६)

मनिंदर सिंग – २७ सुपरटेन (७१)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

टीम इंडीयाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ व्या वनडेत शानदार विजय मिळत मालिकाही जिंकली

प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा राहुल चौधरी केवळ दुसराच खेळाडु

काय सांगता !! प्रो कबड्डीत पहिल्यांदाच एकाच संघात ५ शतकवीर

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.