एका इन्स्टाग्राम पोस्टचे विराट कोहलीला मिळतात एवढे कोटी, ऐकून व्हाल थक्क!

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात जसे नव-नवे विक्रम करत असतो. तसेच तो मैदानाबाहेरही करत आहे. तो नुकताच इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

इन्स्‍टाग्राम शेड्यूलिंग टूल होपर एचक्‍यू के च्या नुसार विराट हा इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 9 व्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या 10 मध्ये तो एकमेव क्रिकेटपटू आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिलचा फुटबॉलपटू नेमार ज्यूनियर आहे. तसेच तिसऱ्या स्थानी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आहे.

क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात भारताचे नेतृत्व करणारा विराट एका इन्स्टाग्राम पोस्टमधून 1 लाख 96 हजार यूएस डॉलर्स(साधारण 1 कोटी 35 लाख 66 हजार रुपये) इतकी कमाई करतो. विराटला सोशल मीडियावर जवळ जवळ 38 मिलियन (3 कोटी 80 लाख) फॉलोअर्स आहेत. तो सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

विराटने नुकतेच 2019 विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले असून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्यफेरीपर्यंत धडक मारली होती. उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. आता विराट पुढील महिन्यात होणाऱ्या विंडीज दौऱ्यात खेळणार आहे.

इन्स्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर असणारा रोनाल्डो हा एका पोस्टमधून 9 लाख 75 कोटी यूएस डॉलर्स( साधारण 6 कोटी 73 लाख 49 हजार रुपये) इतकी कमाई करतो.

इन्स्टाग्राममधून सर्वाधिक कमाई करणारे पहिले 10 खेळाडू

ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल): $ 9,75,000

नेमार (फुटबॉल): $ 7,22,000

लिओनल मेसी (फुटबॉल): $ 6,48,000

डेव्हिड बेकहॅम (फुटबॉल): $ 3,57,000

लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल): $ 2,72,000

रोनाल्डिन्हो (फुटबॉल): $ 2,56,000

गॅरेथ बेल (फुटबॉल): $ 2,18,000

झ्लाटन इब्राहिमोव्हिक (फुटबॉल): $ 2,00,000

विराट कोहली (क्रिकेट): $ 1,96,000 

लुईस सुअरेझ (फुटबॉल): $ 1,84,000

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या दोन खेळाडूंना वनडे संघात संधी न मिळाल्याने सौरव गांगुलीने व्यक्त केले आश्चर्य

भारताचा माजी कर्णधार म्हणतो, ‘…तर धोनी अजूनही खेळू शकतो क्रिकेट’

पंत, अय्यर, गिल सारख्या युवा खेळाडूंबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणाला…

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.