अ गटातील सर्वात महत्वपूर्ण लढत कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध रायगड मराठा मार्वेल्स यांच्यात झाली. दोन्ही संघ 18 गुणांच्या सह गुणतालिकेत चौथ्या व पाचव्या स्थानी होते. आजच्या सामन्या मधील विजयी संघ टॉप 4 मध्ये जाऊन प्ले-ऑफ साठी पात्र होणार होता. सामन्याची सुरुवात अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या दहा मिनिटांत सामना 8-8 असा बरोबरीत सुरू होता.
रायगड मराठा मार्वेल्स संघाची बचावफळी आज जबरदस्त पकडी करत होती. जयेश गावंड व अजय मोरे यांनी सुपर टॅकल करत रायगड संघावर पडणार लोन वाचवला. उलट पलटवार करत कोल्हापूर संघाला ऑल आऊट केले. मध्यंतरापर्यत 21-13 अशी आघाडी रायगड मराठा मार्वेल्स संघाकडे होती. जयेश गावंडने जबरदस्त पकडी करत हाय फाय पूर्ण केला.
मध्यंतरा नंतरही रायगड संघाची बचावफळी जोरदार प्रदर्शन करत होती. जयेश गावंड ने 5, अजय मोरे ने 4 तर विराज पाटील ने 3 पकडी करत जबरदस्त खेळ केला. मात्र शेवटच्या काही मिनिटांत कोल्हापूर संघाने 30-21 अश्या पिझाडीवरून सामना फिरवला. निखिल बर्गेच्या सुपर रेड ने खऱ्या अर्थाने सामना फिरला त्यानंतर तेजस पाटील ने चतुरस्त्र चढाया करत सामना 33-33 असा बरोबरीत कोल्हापूर संघाला राखण्यात यश आले. दोन्ही संघाचे गुणतालिकेत समान गुण झाले मात्र कोल्हापूर संघाचा गुणांचा फरक रायगड पेक्षा चांगला असल्यामुळे कोल्हापूर संघाने टॉप 4 मध्ये आपला स्थान पक्का केला.
बेस्ट रेडर- तेजस पाटील , कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेंडर- जयेश गावंड, रायगड मराठा मार्वेल्स
कबड्डी का कमाल- रुतिक पाटील, रायगड मराठा मार्वेल्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजांना शिस्तीत आणण्यासाठी गावसकरांनी सुचविला ‘हा’ उपाय, म्हणाले, “वाईड चेंडू टाकणारे…”
मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध अहमदनगर पेरियार पँथर्सचा सामना बरोबरीत