आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. या बलाढ्य मुंबई संघाने आयपीएलच्या ४ विजेतेपदांवर आपले नाव कोरले आहे. त्यांच्यामध्ये एकहाती विजय मिळवण्याची क्षमता आहे. मुंबईविरुद्ध विजय मिळवणे सोपी गोष्ट नाही. परंतु मंगळवारी (३ नोव्हेंबर) झालेल्या आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबाद सनरायझर्सने मुंबईला दहाच्या दहा विकेट्सने पराभूत करत एक कारनामा केला आहे.
नाणेफेक जिंकत हैदराबादने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादचे शिलेदार डेविड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा यांनी तडाखेबंद अर्धशतके ठोकत १७.१ षटकातच संघाला १० विकेट्सने विजय मिळवून दिला.
त्यामुळे मुंबईविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवणारा हैदराबाद तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी आयपीएलच्या पहिल्याच हंगामात २००८ साली डेक्कन चार्जर्स (आताचा सनरायझर्स हैदराबाद) संघाने मुंबईला दहा विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर २०११ साली एक वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा संघ राजस्थान रॉयल्सने मुंबईला दहा विकेट्सने पराभूत केले होते.
यापूर्वी मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या ४१ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवला होता.
हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतरही मुंबईने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. आता यावर्षीही मुंबई संघ आयपीएलचे विजेतेपद जिंकणार का?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध दहा विकेट्सने विजय मिळवणारे संघ
२००८- डेक्कन चार्जर्स
२०११- राजस्थान रॉयल्स
२०२०*- सनरायझर्स हैदराबाद
महत्त्वाच्या बातम्या-
-IPL 2020 : हैदराबादविरुद्ध पराभूत होऊनही मुंबईचा ‘खास’ पराक्रम; घातली दुसऱ्या क्रमांकाला गवसणी
-SRH VS MI: चुरसीच्या सामन्यात वॉर्नरची मोठ्या विक्रमाला गवसणी, लागोपाठ सहाव्यांदा केला पराक्रम
-मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके
ट्रेंडिंग लेख-
-‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
-IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?