कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन होऊ शकले नाही. काही महिन्यांनंतर जैव- सुरक्षित वातावरणात क्रीडा स्पर्धांचे आयोजन होऊ लागले. इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगामही जैव सुरक्षित वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. यातच श्रीलंका येथे लंका प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
लंका प्रीमियर लीगचा पहिला हंगाम गुरुवारी (26 नोव्हेंबर) होणार असून यामध्ये 5 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात कोलंबो किंग्ज आणि कँडी टस्कर्स हे दोन संघ आमने-सामने येतील.
श्रीलंका क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू फलंदाज अँजेलो मॅथ्यूस कोलंबो किंग्जचे नेतृत्व करेल, तर युवा फलंदाज कुसल परेराच्या नेतृत्त्वात कँडी टस्कर्स मैदानात उतरेल.
-कोलंबो किंग्ज आणि कँडी टस्कर्स यांच्यातील हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7:30 वाजता खेळला जाईल.
-महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल.
-भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 7 वाजता नाणेफेक होईल.
-या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेलवर होईल.
-सोनी लाईव्ह या ऍप्लिकेशनवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
कोलंबो किंग्ज संघ:
अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), आंद्रे रसल, मनप्रीतसिंग गोनी, लॉरी इव्हान्स, डॅनियल बेल-ड्रममंड, इसुरु उदाना, दिनेश चंडिमल, अमिला अपोंसो, आशान प्रियंजन, रवींदरपाल सिंग, कायस अहमद, दुशमंत चमीरा, जेफरी वेंडरसे, थिकशीला डी सिल्वा, थरींदू कौशल, लहिरू उदारा, करीम खान सादिक, धम्मिका प्रसाद, हिमेश रामानायके, कलाना परेरा, थरींदू रत्ननायके, आणि नवोद परनाविथाना.
कँडी टस्कर्स संघ:
कुसल जेनिथ परेरा, कुसल मेंडिस, नुवान प्रदीप, सीक्कुज प्रसन्ना, असला गुनेरथने, कमिंदु मेंडिस, दिलरुवान परेरा, प्रियामल परेरा, कविष्का अंजुला, लसिथ एम्बुल्डेनिया, लहिरू समरकून, निशान मदुष्का फर्नांडो, चमिकारा जेदिरिनिसिंगे, नवीन-उल-हक, इरफान पठाण, मुनाफ पटेल, रहमानुल्ला गुर्बाज.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
रहाणेने मागितली शेजाऱ्यांची माफी; धवन म्हणाला, ‘तू तुझ्या मुलीबरोबर…’
आईने मजुरी करून वाढवले; आज भारतीय संघाच्या जर्सीत मिरवतोय ‘हा’ खेळाडू
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज