साऊथँम्पटन। आज(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात वनडे मालिकेतील तिसरा सामना रोज बॉल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून कर्णधार ओएन मॉर्गनने तुफानी शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.
मॉर्गनने आज ८४ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांसह १०६ धावा केल्या. हे मॉर्गनचे इंग्लंडकडून खेळताना वनडेत केलेले १३ वे शतक आहे. त्यामुळे आता तो इंग्लंडकडून वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने हा पराक्रम करताना मार्कस ट्रेस्कोथिकच्या १२ वनडे शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
इंग्लंडकडून वनडेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम २९ वर्षीय जो रुटच्या नावावर आहे. रुटने आत्तापर्यंत १६ शतके केली आहेत. विशेष म्हणजे इंग्लंडकडून आत्तापर्यंत वनडेत १० किंवा त्यापेक्षा अधिक शतके केवळ रुट, मॉर्गन आणि ट्रेस्कोथिकनेच केली आहेत. त्यांच्याशिवाय इंग्लंडकडून अन्य क्रिकेटपटूंना १० पेक्षा अधिक शतके वनडेत करता आलेली नाहीत.
याबरोबरच मॉर्गन हा इंग्लंडकडून २०० किंवा त्यापेक्षा अधिक वनडे सामने खेळणारा एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने आत्तापर्यंत २१६ वनडे सामने इंग्लंडकडून खेळले आहेत.
इंग्लंडकडून वनडेत सर्वाधिक शतके करणारे क्रिकेटपटू –
१६ शतके – जो रुट (१४६ सामने)
१३ शतके – ओएन मॉर्गन (२१६ सामने)
१२ शतके – मार्कस ट्रेस्कोथिक (१२३ सामने)
९ शतके – जॉनी बेअरस्टो (८० सामने)
९ शतके – केविन पिटरसन (१३४ सामने)
९ शतके – जॉस बटलर (१४२ सामने)
९ शतके – जेसन रॉय (९० सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
मॉर्गनने आज अशी काही धुलाई केली की धोनीच्या खास विक्रमाचाही केला पालापाचोळा
बीसीसीआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार
२०१९ वर्ल्डकपमधील ५ पैकी हे शतक रोहित शर्माचे खास, कारणही आहे विशेष
ट्रेंडिंग लेख –
कॅप्टन्सीची एकही संधी न मिळता सर्वाधिक कसोटी सामन्यात टीम इंडियाची सेवा करणारे ३ दिग्गज
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन