कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने यावर्षी होणारी टी२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयसाठी आयपीएल २०२० चे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता आयपीएल २०२० चा मोसम १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये होणार असल्याची पुष्टी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे.
याआधीही २०१४ ला आयपीएलचे २० सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे युएईमधील हा जुना अनुभवही लक्षात घेऊन यावेळीचा आयपीएल मोसम आयोजित केला जाईल.
परंतु बीसीसीआयपुढे बरीच कामे बाकी आहेत. भारत सरकारची परवानगी घेणे आणि खेळाडूंची प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. भारतातील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे खेळाडूंचे प्रशिक्षणदेखील झाले नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीसीसीआय पुढील पर्याय शोधत आहे, परंतु हा प्रवास तितकासा सोपा नाही.
युएईमध्ये आयपीएल स्पर्धा आयोजित केली तर पुढील तीन जागतिक दर्जाचे स्टेडियम वापरले जाऊ शकतात. या लेखात त्या ३ स्टेडियमबद्दल जाणून घेऊ.
आयपीएल २०२० चे सामने होऊ शकतात युएईच्या या ३ स्टेडियमवर
शारजाह क्रिकेट स्टेडियम –
शारजाह मधील हे सुंदर स्टेडियम १९८० मध्ये बांधले गेले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येथे अनेक मालिका आणि सामने येथे खेळले गेले आहेत. या स्टेडियममध्ये १७ हजार प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे. आता पर्यंत या मैदानावर २३६ वनडे सामन्यांचे आयोजन केले गेले आहे.
या ठिकाणी पाकिस्तान सुपर लीगचे(पीएसएल) अनेक सामने खेळले गेले आहेत. ग्रेटर नोएडा पूर्वी अफगाणिस्तानचे हे घरचे मैदान होते. २०१४ च्या आयपीएलमधील प्रारंभिक सामने या मैदानावर खेळले गेले होते. त्यामुळे आयपीएल २०२० चे सामने या मैदानावरही होऊ शकतात.
शेख ज़ायद क्रिकेट स्टेडियम – अबू धाबी
या क्रिकेट स्टेडियमची एक वेगळी ओळख आहे. या मैदावरील पहिला वनडे सामना २००६ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळाला गेला. तर येथे २०१० मध्ये पहिला कसोटी सामना पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. या स्टेडियममध्ये २०,००० प्रेक्षकांची बसण्याची क्षमता आहे. येथे प्रत्येक प्रत्येक स्वरूपाचे अनेक सामने खेळले गेले आहेल. अबुधाबीमध्ये पीएसएल आणि आयपीएल २०१४ चे सामने खेळले गेले आहेत.
दुबई अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम-
प्रेक्षकांच्या दृष्टीने, हे युएई मधील सर्वात मोठे स्टेडियम म्हटले जाऊ शकते. या स्टेडियममध्ये २५ हजार प्रेक्षकांच्या बसण्याची क्षमता आहे. तसेच आयपीएल २०१४चे सामनेही येथे खेळले गेले आहेत. एशिया कप २०१८ देखील येथे खेळला गेला आहे. येथील सीमारेषा मोठी असल्यामुळे फलंदाजांना षटकार मारणे थोडं अवघड जात. २००९ मध्ये हे स्टेडियम सुरू झाले. पाकिस्तान संघ बर्याचदा येथे खेळतो. विशेष गोष्ट अशी की आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्येही आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्टुअर्ट बिन्नीने ‘तो’ मोठा विक्रम मोडल्यानंतर अनिल कुंबळेनी पाठवला होता ‘हा’ खास संदेश
‘घराणेशाही’च्या आरोपामुळे त्रस्त होता हा पाकिस्तानचा खेळाडू; बाथरूममध्ये रडायचा तासंतास
भारताचा हा युवा खेळाडू कमावतोय आफ्रिदीच्या तुलनेत आयपीएलमध्ये ३ पटीने अधिक रूपये
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ….
निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री