साऊथँम्पटन। आज(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात वनडे मालिकेतील शेवटचा सामना रोज बॉल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंड संघ प्रथम फलंदाजी करत होता. यावेळी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. इंग्लंडने १० षटकात ३ विकेट्स गमावल्या होत्या.
इंग्लंडकडून सलामीला फलंदाजीला आलेला जेसन रॉय केवळ १ धाव करुन बाद झाला. त्याला क्रेग यंगने बाद केले. विशेष म्हणजे रॉय या वनडे मालिकेतील पहिल्या २ सामन्यातही क्रेगच्याच गोलंदाजीवर बाद झाला होता. तो क्रेगचा सामना करत असताना मागील ८ चेंडूत ३ वेळा बाद झाला आहे. या ८ चेंडूत त्याला केवळ क्रेग विरुद्ध १ धाव करता आली आहे.
तो पहिल्या वनडेत २४ धावा केल्यानंतर क्रेगच्या गोलंदाजीवर पायचीत झाला होता. त्यानंतर तो दुसऱ्या वनडेत क्रेगविरुद्ध ३ चेंडू खेळून शुन्यावर झेलबाद झाला. तर आज तिसऱ्या वनडेत त्याला ४ चेंडूत १ धावच करता आली.
या सामन्यात इंग्लंडची सुरुवात खराब झाली असली तरी नंतर कर्णधार ओएन मॉर्गनने १०६ धावांची शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याला टॉम बँटनने चांगली साथ दिली. बँटनने ५८ धावा केल्या. तर डेव्हिड विलीने ५१ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने ४९.५ षटकात सर्वबाद ३२८ धावा केल्या.
इंग्लंडकडून एका मालिकेतील सर्वात कमी धावांची सलामी भागीदारी –
इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात सुरु असलेल्या या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडच्या सलामीवीरांनी केवळ १४ धावांची भागीदारी केली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जॉनी बेअरस्टो आणि रॉयमध्ये १२ धावांची सलामी भागीदारी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांची शुन्य धावांची भागीदारी झाली. तर आजच्या तिसऱ्या सामन्यात ते केवळ २ धावांची सलामी भागीदारी करु शकले.
त्यामुळे इंग्लंडकडून एका वनडे मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा अधिक डावात सलामीला फलंदाजी करताना सर्वात कमी धावांची भागीदारी करण्याचा नकोसा विक्रम बेअरस्टो आणि रॉय यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.
इंग्लंडकडून एका वनडे मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा अधिक डावात सलामीला फलंदाजी करताना सर्वात कमी धावांची भागीदारी करणाऱ्या जोड्या –
१४ धावा – जॉनी बेअरस्टो-जेसन रॉय – (विरुद्ध आयर्लंड, २०२०)
१७ धावा – माईक बर्ली-सर जेफ बॉयकॉट – (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९७८/७९)
१९ धावा – नासिर हुसेन-निक नाईट – (विरुद्ध झिम्बाब्वे, १९९९)
१९ धावा – ऍलेक्स हेल्स-जेसन रॉय – (विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१७)
महत्त्वाच्या बातम्या-
३३ वर्षीय मॉर्गनने वाढवले रुटचे टेन्शन, आता मोठा विक्रमही धोक्यात
मॉर्गनने आज अशी काही धुलाई केली की धोनीच्या खास विक्रमाचाही केला पालापाचोळा
-बीसीसीआयने नाही म्हटले नाही, पण विवोनेच घेतली प्रायोजक होण्यापासून माघार
ट्रेंडिंग लेख-
-सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
-कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन
-लॉर्ड्सवरील ऑनर्स बोर्डवर नाव नसलेले ५ महान फलंदाज