टी-२० या क्रिकेट प्रकारात खेळाडूंना नेहमी आक्रमक अंदाजात फलंदाजी करताना पाहायला मिळते. या प्रकारात सर्व फलंदाजांचा एकच प्रयत्न असतो की, कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा काढणे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे, ३ टी-२० आणि ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.
भारतीय संघाकडे टी-२० मालिकेसाठी शानदार खेळाडू आहेत, जे कोणत्याही गोलंदाजांना सामोरे जाताना वेगाने धावा करू शकतात. भारत या दौऱ्यातील आपला पहिला टी-२० सामना ४ डिसेंबरला खेळेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात नेहमीच या क्रिकेट प्रकारात काट्याची टक्कर पाहायला मिळते. २०१६ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे टी-२० मालिका झाली होती. त्यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीवर मात देत ३-० या फरकाने मालिका जिंकली होती.
दोन्ही संघ दोन आठवड्यांपूर्वी आयपीएल खेळून परत आलेत. अशातच दोन्ही संघाचे खेळाडू या मालिकेसाठी पूर्णपणे तयार आहेत. भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त प्रदर्शन करतांना षटकारांची बरसात केलीय. त्यामुळे या लेखात आपण ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणार्या तीन भारतीय खेळाडूंबद्द्ल जाणून घेणार आहोत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे ३ भारतीय फलंदाज
३. युवराज सिंग, ५ षटकार (डर्बन, २००७)
सन २००७ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये युवराजकडून खेळलेली दमदार खेळी कोण विसरू शकतं? डर्बन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत. प्रथम फलंदाजी करताना पहिले दोन गडी लवकर बाद झाले होते. त्यावेळी युवराज सिंगने फलंदाजीला येत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचे चेंडू सीमापार लगावले. युवराजने केवळ ३० चेंडूत ७० धावांची खेळी साकारताना ५ गगनचुंबी षटकार खेचले होते. त्यामुळे भारताने हा सामना जिंकून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आणि फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करून टी२० विश्वचषकाचे पहिले वहिले विजेतेपद जिंकले.
२. विराट कोहली, ६ षटकार (बंगळुरू, २०१९)
भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा जास्त तर वनडे आणि कसोटी प्रकाराला जास्त महत्त्व देतो. परंतु हा फलंदाज जेव्हा टी-२० प्रकारात खेळतो, तेव्हा खेळाचा खूप आनंद घेतो. या प्रकारात विराट कोहलीची कामगिरी उत्कृष्ट आहे. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार लगावण्यात भारतीय खेळाडूंमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे.
विराटने मागील वर्षी बंगळुरूच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसर्या टी-२० सामन्यात ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याच्या ६ षटकारांचा समावेश होता.
१. रोहित शर्मा, ६ षटकार (ब्रिजटाऊन, २०१०)
भारतीय संघाचा सलामीचा प्रमुख फलंदाज रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. सन २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पंधराव्या सामन्यात, रोहितने मधल्या फळीत फलंदाजीला येत एकट्यानेच संघर्ष करताना ४६ चेंडूत ७९ धावांची खेळी केली होती. या सामन्यात त्याने ६ षटकार ठोकले होते.
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन भूमीत वनडेमध्ये सर्वाधिक चेंडूचा सामना करणारे ३ भारतीय फलंदाज
भारतीय संघातील ५ खेळाडू ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटीत केली आहे दमदार कामगिरी
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
रहाणेने मागितली शेजाऱ्यांची माफी; धवन म्हणाला, ‘तू तुझ्या मुलीबरोबर…’
आईने मजुरी करून वाढवले; आज भारतीय संघाच्या जर्सीत मिरवतोय ‘हा’ खेळाडू