भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिले दोन सामने नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे पार पडले असून शेवटचे तीन सामनेही येथेच पार पडणार आहेत. या मालिकेकडे भारतीय संघ व्यवस्थापन विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने पाहात आहे. याचमुळे तब्बल १९ खेळाडूंचे स्कॉड या मालिकेसाठी निवडले गेले असून एकही सामना न खेळलेल्या खेळाडूंना या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे.
नविन खेळाडूंना या मालिकेत संधी देण्याबदद्ल कर्णधार विराट कोहलीने यापुर्वीच भाष्य केले आहे. कदाचीत याचाच फटका सध्या संघात खेळत असलेल्या काही खेळाडूंना बसू शकतो. परंतू यात केएल राहुललाल मात्र खराब कामगिरीची किंमत चुकवावी लागू शकते. तिसऱ्या टी२० सामन्यात या तीन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता थोडी कमीच वाटतेय.
केएल राहुल-
सलामीवीर फलंदाज केएल राहुलला तिसऱ्या टी२० सामन्यातून वगळले जावू शकते. पहिल्या दोन टी२० सामन्यात त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या सामन्यात १ तर दुसऱ्या सामन्यात भोपळाही न फोडता तंबूचा रस्ता धरला होता. तसेच रोहित शर्माच्या जागी संधी दिलेल्या इशान किशनने दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरी केलीय. त्यामुळे दोन सामन्यात विश्रांती दिलेल्या रोहितसाठी केएल राहुलला जागा खाली करावी लागण्याची शक्यता आहे.
वॉशिंग्टन सुंदर-
गेल्या तीन टी२० सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या टी२० सामन्यात त्याने ४ षटकांत २९ धावा देत २ विकेट्स घेतल्या आहेत. परंतू मालिका सुरु होण्यापुर्वीच कर्णधार कोहलीने नविन खेळाडूंना संधी देण्याचे सुतोवात केले होते. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला आराम देऊन राहुल तेवतियाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तेवतियाने आयपीएल २०२०मध्ये आपली गोलंदाजी व फलंदाजीने समस्त क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. फलंदाजीत ४२च्या सरासरीने २५५ धावा व ७च्या इकॉनॉमी रेटने १० विकेट्स त्याने घेतल्या होत्या. याचमुळे त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे.
युझवेंद्र चहल-
इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत चहलला नावाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पहिल्या सामन्यात ४ षटकांत त्याने ४४ धावा दिल्या होत्या तर दुसऱ्या सामन्यात ४ षटकांत त्याने ३३ धावा दिल्या. याच कामगिरीमुळे चहलला बाहेरचा रस्ता दाखवून राहुल चहरला कर्णधार कोहली संधी देऊ शकतो. चहर यापुर्वी एक टी२० सामना खेळला असून त्यात त्याने एक विकेट घेतली आहे. तो मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
आयपीएल लिलावात पैसे जास्त मिळाले म्हणून चेंडू जास्त स्विंग होत नाही किंवा खेळपट्टीवर गवतही येत नाही
राजकारणापासून समाजसेवेपर्यंत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी