गुरुवारी (०२ जून) रोजी लखनऊ व सोनिपत हरियाणा येथे भारतीय कुस्ती महासंघाच्या माध्यमातून पारपडलेल्या बहरीन येथे होणाऱ्या १५ व २० वर्षा आतील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणीमध्ये महाराष्ट्राच्या ५ कुस्तीगिरांची निवड झाली आहे. १५ वर्षा आतील मुलींच्या संघात ३६ किलो वजनी गटात श्रावणी लवटे हिची निवड झाली. श्रावणी आय एस कुस्ती केंद्र दोनवडे कोल्हापूर येथे कुस्ती कोच संदीप पाटील यांच्या कडे सराव करते.
१५ वर्षा आतील मुलांच्या संघात कोकण विभागातून प्रथमच ग्रीको रोमन प्रकारात
५२ किलो वजनी गटात प्रेक्षणीय अटीतटीच्या स्पर्धेत प्रणय चौधरी ( ठाणे जिल्हा ) याची निवड झाली, प्रणय हा रुस्तम -ए – हिंद कुस्ती अकादमी येथे रुस्तम-ए- हिंद, महाराष्ट्र केसरी पै अमोल बुचडे यांच्या कडे सराव करतो.
५७ किलो तुषार तुकाराम पाटील ( कोल्हापूर ) याची निवड झाली तुषार हा भारतीय खेल प्राधिकरणाच्या (कांदिवली मुंबई ) येथील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आदरणीय क्षेत्रीय निदेशक महोदया सुष्मिता ज्योतिषी यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती प्रशिक्षक अमोल यादव व अजय सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे.
६२ किलो फ्री स्टाईल वजनी गटात तनिष्क कदम ( पुणे ) याची निवड झाली तनिष्क हा सह्याद्री कुस्ती संकुल पुणे येथे पै विजय बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
२० वर्षा आतील निवड चाचणी मध्ये १२५ किलो आतील खुल्या गटात महेंद्र गायकवाड ( सोलापूर ) याची निवड झाली महेंद्र आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुन पुरस्कार प्राप्त काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. निवड झालेले कुस्तीगीर बहरीन येथे होणाऱ्या १५ व २० वर्षा आतील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धे साठी भारताचे प्रतिनिधित्व कारणात आहेत.
मागील वर्षातील राष्ट्रीय स्पर्धेच्या नियोजनबद्ध खुल्या निवडचाचणी मधून निवडून वरील सर्व कुस्तिगीर राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त करून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल्याने कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मा . ना.शरदराव पवार साहेबानी सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे व कार्यकारणी तसेच निवड झालेल्या कुस्तीगीरांचे त्यांच्या पालक व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले व आंतरराष्टीय पदकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
एक रॅकेट हातात घेऊन जाणे ते प्रत्येक पाँईटनंतर घाम पुसणे, राफेल नदालबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी
जेम्स अंडरसनच्या चतुर गोलंदाजीने ‘दादा’ला केलं इंप्रेस, व्हिडिओ शेअर करत उधळली स्तुतीसुमने