भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात रविवारी (2 ऑक्टोबर) मालिकेतील दुसरा टी20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याला पुन्हा एकदा विक्रम रचण्याची संधी आहे. त्याने पहिल्या साममन्यात नाबाद अर्धशतकी खेळी करताना अनेक विक्रम केले होते. आता त्याला दुसऱ्या सामन्यात विराट कोहली याच्या यादीत सामील होण्याची संधी आहे.
भारताच्या टी20 संघात उशिरा पदार्पण करणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी ओळखला जात आहे. त्याने यावर्षी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक 732 धावा करत पहिले स्थान गाठले आहे. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. यासाठी त्याला दुसऱ्या टी20मध्ये 24 धावा करण्याची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये जलद 1000 धावा केवळ भारताकडून विराट कोहली आणि केएल राहुल यांनीच केला आहे.
सूर्यकुमारने ही कामगिरी केली तर तो तिसराच भारतीय फलंदाज ठरणार आहे. त्याने आतापर्यंत 32 सामन्यांतील 30 डावांमध्ये 39.04च्या सरासरीने आणि 173.36च्या स्ट्राईक रेटने 976 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 117 आहे.
Hit it like SKY! 👌👌
Enjoy that cracking SIX 🎥 🔽Follow the match ▶️ https://t.co/L93S9k4QqD
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia pic.twitter.com/7RzdetvXVh
— BCCI (@BCCI) September 28, 2022
विराटने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एक हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी 27 डावांमध्ये फलंदाजी केली, तर राहुलने 29 डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. तसेच सूर्यकुमार हा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा नववाच भारतीय फलंदाज ठरणार आहे. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अव्वल स्थानावर आहे. त्याने 140 सामन्यांमध्ये 3694 धावा केल्या आहेत, तर विराटने 108 सामन्यांमध्ये 3663 धावा केल्या आहेत. राहुल 2080 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
या यादीत शिखर धवन (1759), एमएस धोनी (1617), सुरेश रैना (1605), युवराज सिंह (1177) आणि श्रेयस अय्यर (1029) आहे. सूर्यकुमारच्या पुढे हार्दिक पंड्या आहे. त्याने 989 धावा केल्या आहेत, मात्र तो या मालिकेचा भाग नसल्याने सूर्यकुमारला पुढे जाण्याची संधी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या टी-20त भारताकडे इतिहास रचण्याची संधी; कधी जमला नाही, तो पराक्रम करणार रोहित आणि कंपनी
VIDEO: RSWS फायनलचा हिरो नमन ओझाच्या शतकानंतर सचिनने दिलेली रिऍक्शन व्हायरल
शमीची तयारी पूर्ण! साधतोय थेट स्टंप्सवर निशाणा; पाहा व्हिडिओ