आयपीएल 2024 मधील 41 वा सामना काल (दि. 25 एप्रिल) हैद्राबादमध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने सनरायझर्स हैदराबाद संघावर दणदणीत विजय प्राप्त केला. आरसीबीने सनरायझर्स हैदराबादवर 35 धावांनी मात करत विजय साकारला आणि सलग दोन पराभवांच्या हॅटट्रीक नंतर मोसमातील दुसरा विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे.
किंग कोहलीचा खास विक्रम –
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात रजत पाटीदार याने जसे खणखणीत अर्धशतक झळकावले. तसेच संघाचा आधारस्तंभ विराट कोहली यानेही अर्धशतक झळकावले आहे. विराटने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याचबरोबर विराटने या मोसमात आपल्या 40 धावाही पूर्ण केल्या. ( Virat Kohli belts out multiple records with 51 run knock against SRH in IPL 2024 completes 4k runs as opener )
यासह विराटने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. लीग मध्ये 10 वेगवेगळ्या हंगामात 400 हून अधिक धावा करणारा विराट कोहली हा आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर त्याने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून 4 हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा सलामीवीर ठरला आहे.
100th game 𝐖
200th game 𝐖
250th game 𝐖Massive relief and the momentum is building pretty well. 👊#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #SRHvRCB pic.twitter.com/gnzpy0fSi8
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 25, 2024
Playing the situation and perfectly anchoring another brilliant innings.
Fifty #53 for Virat in the IPL 🫡#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #SRHvRCB pic.twitter.com/GHVN9gdFNX
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 25, 2024